व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांना अच्छे दिन येतील : खासदार इम्तियाज जलील

बीडमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन ; शेकडो पत्रकारांची उपस्थिती --------------------------------------------------------------------------------- बीड / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) देशभरात व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच, पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान कौशल्य याकडे लक्ष दिले जातेय. व्हॉईस ऑफ मीडियाचे नेतृत्व करणारी फळी पाहता पत्रकारांचे देखील अच्छे दिन येतील, असा विश्वास निर्माण झाला आहे, असे मत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. बीड येथील वैष्णो पॅलेस येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन खासदार डॉ.प्रितम मुंडे, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हस्ते रविवारी (दि.३०) झाले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म...