पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा आणखीन एक निर्णय ठरतोय देशातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा..! साठवणुकीचे निर्बंध हटवले अन् सोयाबीनचे भाव वाढले - भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा आणखीन एक निर्णय ठरतोय देशातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा..! साठवणुकीचे निर्बंध हटवले अन् सोयाबीनचे भाव वाढले - भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी अंबाजोगाई (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक निर्णय घेतल्यानंतर त्यामागे शेतकर्यांचे कसे भले होते ? हा आर्थिक चमत्कार देशातील समस्त शेतकरी बांधवांनी चार दिवसांपूर्वीच अनुभवला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन व इतर तेलबीयांच्या साठवणुकीवरील निर्बंध हाटवता क्षणीच अवघ्या काही तासातच सोयाबीनचे भाव वाढले. पाच हजारी असलेले सोयाबीन या निर्णयामुळे सहा हजार रूपयांपर्यंत पोहोचले. कदाचित सात हजार जावू शकेल. नेतृत्वात कल्याणाची दुरदृष्टी असेल तर त्याचा फायदा कसा होतो ? या कृतीतून देशवासियांनी पाहिला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले. आमच्या प्रतिनिधी बोलताना कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, मागच्या आठवड्यात देशातील शेतकर्यांनी केंद्र सरकार तथा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एका निर्णयाचा घेतलेला अनुभव आर्थिकदृष्ट्या क्रांतीकारक कसा ठरला ? ज्यातून सिद्ध झालं. वास्तविक पहाता मागच्या आठ वर्षांपास...