भारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
भारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार - जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
अंबाजोगाई (वार्ताहर)
"भारत जोडो यात्रा" ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेले एक मोठे आणि विधायक जनआंदोलन आहे, ज्याचा उद्देश नवी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कथित विभाजनवादी राजकारणा विरूद्ध देशाला एकत्र आणणे आहे. ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे, तसेच वाढती महागाई, बेरोजगारी, सत्तेचे राजकीय केंद्रीकरण आणि विशेषत: भय, कट्टरता आणि द्वेषाच्या विखारी राजकारणाविरूद्ध लढण्यासाठी हे जनआंदोलन तयार करण्यात आले असून मंगळवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी भारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होवून खा.राहूलजी गांधी यांच्यासोबत चालणार आहेत अशी माहिती देवून काँग्रेस प्रेमी जनता, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कामगार, सर्व समाज घटक, नागरिक, महिला, युवक आणि युवती यांनी या यात्रेत हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बीड काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, खासदार राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू केली. सध्या ही यात्रा कर्नाटकात आहे. यात्रेचा समारोप पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला काश्मीर मध्ये होणार आहे. या प्रवासात एकूण ३५७० किलोमीटर एवढे मोठे अंतर कापले जाणार आहे. पक्षाने खासदार राहुलजी यांच्यासह पक्षाच्या ११९ नेत्यांना 'भारत यात्री' असे नांव दिले आहे, जे पदयात्रा काढत काश्मीरला पोहोचणार आहेत. 'भारत जोडो' यात्रेला महाराष्ट्रात देगलूर मार्गाने सुरूवात होणार आहे. या याञेच्या स्वागतासाठी
बीड जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष कमेटीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते राहूलजी गांधी यांची "भारत जोडो यात्रा" सध्या चांगलीच गाजते आहे. राहूलजी गांधी यांची कित्येक किलोमीटरची पायपीट आणि त्यात सर्वसामान्यांना सोबत घेत ढवळून काढलेले वातावरण हे या यात्रेचे वैशिष्ट्ये ठरत आहे. ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेचा प्रवास केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब असा असणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधरणतः ७ तारखेला दाखल होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून "भारत जोडो यात्रा" महाराष्ट्रात प्रवेश करेल. वाढती महागाई, जाती-धर्मात व समाजात फूट पाडणारे विखारी, भेदभावपूर्ण राजकारण संपवून देशाला एकजूट करणे, संपूर्ण भारतात सर्वधर्मसमभाव जोपासून देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनविणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. राहूलजी गांधी यांच्या देश जोडण्याच्या या विधायक मोहिमेला देशभरातून सर्वस्तरांतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. या यात्रेत बीड जिल्ह्यातून खासदार सौ.रजनीताई पाटील व माजी मंञी अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली २५ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरूण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहेत. भारत जोडो यात्रेचा ३५०० किमी लांबीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही "भारत जोडो यात्रा" ही ७ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रामध्ये येत आहे. ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, १५ ते १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, १६ ते १८ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि १८ ते २० रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे. भारत जोडो याञा ही सीमेवर येताच ८ नोव्हेंबर रोजी पहिल्याच दिवशी बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष नेते, पदाधिकाऱ्यांसह
नागरिक हे कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर एकञित येवून सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत समाजातील प्रत्येक घटक या यात्रेत सहभागी होतांना दिसतो आहे. खा.राहूलजी गांधी यांचा या यात्रेतील साधेपणा सगळ्यांनाच भावत असल्याने, महाराष्ट्रात देखील भारत जोडो यात्रेचे असेच जल्लोषात आगमन व स्वागत झाले पाहिजे, यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्ह्यात खासदार सौ.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य अशोकराव पाटील, उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह बीड जिल्हा काँग्रेस कमेटीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या वेळेस "भारत जोडो याञेत" सर्व सन्माननिय कॉंग्रेस नेते, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष, आजी- माजी पदाधिकारी, एनएसयुआय, युवक काँग्रेस, सेवादल, महिला काँग्रेस, काँग्रेसच्या विविध सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांसह सुमारे २५ हजार कार्यकर्ते बीड जिल्ह्यातून सहभागी होवून राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांच्यासोबत चालणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment