आदर्श बंधू विनोद नरहरराव रापतवार

प्रासंगिक लेख : आदर्श बंधू विनोद नरहरराव रापतवार

****************************************

अंबाजोगाईचे भुमिपुत्र विनोद वत्सला नरहरराव रापतवार (जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर) यांना कर्मवीर डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा "आदर्श बंधु भरत पुरस्कार-२०२४ जाहीर झाला आहे. २६ मे रोजी उंदरी ता.केज जि.बीड) येथे एका विशेष समारंभात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते विनोद रापतवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी उंदरी, ता.केज जि.बीड) येथे कृषी महाविद्यालय लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे त्यांचे ज्येष्ठ दिवंगत बंधू सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बालासाहेब ठोंबरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी मेळाव्याचे आयोजन करतात. कवि संमेलन भरवतात. विविध क्षेत्रातील गुणी जणांचा सन्मान करतात. यावर्षी ही दिमाखदार सोहळ्याचे आयोजन २५ आणि २६ में २०२५ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अंबाजोगाई येथील साहित्यिक राजेंद्र रापतवार यांनी त्यांचे लहान बंधू सत्कारमूर्ती विनोदजी रापतवार यांना दिलेल्या अभिनंदन व आशिर्वादपर शब्द शुभेच्छा वाचकांच्या माहितीस्तव देत आहोत. त्या आपणांस निश्चितच आवडतील असा विश्वास आहे..!

****************************************

विनोद रापतवार हा माझा लहान बंधु. असे असले तरी वैचारिक व बौद्धिक प्रगल्भता माझ्यापेक्षा मोठी ही वस्तुस्थिती त्याच्या वर्तनातून वेळप्रसंगी दृष्टीपथात येते. आपल्या स्वकर्तत्वाच्या बळावर त्याने मिळविलेली सामाजिक प्रतिष्ठा गौरवसंपन्न आहे. त्याचे चांगुलपणाचं व्यक्तीमत्व हे इतरांप्रती आदर्श जीवनप्रणालीचा माईलस्टोन आहे. सर्वांप्रती नैसर्गिक निखळ निरागस प्रेम ऊर्जा जपल्याने सामाजीक चांगुलपणा त्याच्या अंगी दिसून येतो. लहान-मोठ्या प्रती समान आदरभाव, नैतिकमुल्याधिष्ठीत गुणसंपन्नतेचं व्यक्तिमत्व त्याच्या अंगी भिनलेलं आहे. त्याचं अंतरिक कविमन, प्रबोधनपर वृक्तत्वातील संभाषण माधुर्य, निसर्गत: लहान-मोठया प्रती समान आदरभाव हा कौतुकास्पद आहे. याच बरोबर नैतिकमुल्यांच आचरण, प्रत्येकांशी निस्वार्थपणे सुसंवाद हा नेहमीच 'तारिफे काबील' असा तुझ्या प्रभावी जीवनशैलीचा मानबिंदू ऐवज राहिलेला आहे. आम्हाला याचही कौतुक आणि अभिमान आहे. विनोद, बंधु तू मराठवाडयातील बालाघाट रांगातील अंबाजोगाईचा सुपुत्र असून ही विदर्भात नागपुर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासन, प्रशासन व जनता यांच्या स्नेहभावातील सद्भावना तू जपली आहेस. प्रशासकीय जबाबदारी सक्षमपणे निभावणारी तुझी लोकप्रियता, सकारात्मक वृत्तांकन शैली व प्रशासनातील दुवा बनणारी कर्तव्यशिलता ही पारदर्शक असल्याचे सर्वसाक्षी आहे. तुझ्या संकल्पनेतून तू नांदेड येथे जिल्हा माहिती अधिकारी असताना प्रकाशित झालेलं "मराठवाडा मुक्ती संग्राम वर प्रकाशित दृष्यश्राव्य मराठी भाषेतील पुस्तक, मिशन गौरी लघुपट हे सामाजिक प्रतिष्टा वृद्धिंगत करून गेलेली बलस्थानं आहेत. नागपूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यकाळातील लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रशासकीय पातळीवर जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल तुझी निवडणूक अधिकारी यांच्या तर्फे मिळाले गौरवाचे प्रमाणपत्र हे ही तुझ्या सक्षम प्रशानाचं महत्व अधोरेखित करत. हा सुद्धा तुझ्या जीवनातील अभिमानास्पदच गौरवशाली क्षण आहेत. बंधु विनोद..! माझ्या स्वरचित "शांतीदूत" कवितेतील नायक ; आम्हां बहिण - भावंडातील सद्गुणी व्यक्तिमत्वाचा एक अष्टपैलू डायमण्ड आहेस तू..! हिमालयाचा बर्फ वितळून वाहणार्‍या स्वच्छ शितल पाण्यासारखं तुझे मन. अन्तर्मन व वर्तन यात एकच प्रतिंबिंब दर्शवणारं तूझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. दिलखुलास स्मितहास्य कायम आपल्या चेहऱ्यावर चैतन्यरूप ठेवणारं तुझं वर्तन सर्वांनाच स्नेहाने आकर्षित करतं. मनमिळावू..! चंगुलपणाने माणस जोडणारा, लहान-थोर सर्वांचं मन प्रफुल्लीत ठेवण्यासाठी विनोदी बाण्याला बौद्घिकतेची सांगड घालून सर्वांची मने जिंकणारा तुझा स्वभाव सर्वांनाच प्रिय आहे. सामाजिक प्रबोधनाचा दिपस्तंभ, स्वकर्तत्वान, सामाजिक, राजकीय, वृतविद्या व प्रसिद्घी क्षेत्रात आपली प्रामाणिकपणाने दैदिप्यमान छाप पाडणारा तू दिपस्तंभ आहेस..! सुसंवादाची, मधुरतम भाषाशैली, छान वृक्तत्व, संभाषण कौशल्याचा महामेरू विचारधन असलेला तू बंधु..! आपल्या कृतिशीलतेतून सर्वांवर चांगुलपणाची छाप पाडणारा, बल्ले बल्ले, वाह वाहवाने प्रतिसाद घेणारा अप्रतिम गुणांचं राजस्व अबाधित ठेवणारा असाच आमचा सुपरिचित बंधु विनोद..! वेळोवेळी कौटुंबिक बिकट परिस्थितीत केलेला सहयोगीबाणा. आमच्या चांगल्या सुखकर जीवन प्रवासासाठी मार्गदर्शकस्तंभा सारखी जीवनाच्या पाऊल वाटेवर प्रकाशमानाची ऊर्जावान अवस्था निर्माण करणारी तुझी अस्तित्वातली जिवनशैली आहे. तुझं हे चांगुलपण सुख-दु:खाच्या समयी आम्हाला सन्मान्यजन्य स्थितीत सकारात्मक ठेवण्याच बळ देण्यासाठी तथा मन:शांती टिकवून ठेवून सकारात्मक आत्मविश्वासाला प्रेरणादायी ठरतं. तुझे सुसंस्कार, नैतिकमुल्ये जपणार वर्तन व सर्वांप्रती जपत असलेला स्नेह, जिव्हाळा फुलपाखरा सारखं सदैव्य आमच्या भोवती रूंजी घालत असतात. आपलं मातृ-पितृ छत्र हरवलेल्या व माझ्या वार्धक्याकडे झुकत चाललेल्या मनाला धैर्याने जगण्याचं, चुकलेल्या पाऊल आणि अडचणींच्या वळणावर सन्मार्गावर नेण्याचं बळ मला तुम्हा लहान भावंडासह व लहान-मोठया बहिणींसह स्नेही जिवलग मित्रजनांकडूनही तितक्याच निरागसतेने नेहमीच मिळत राहिलेलं आहे. तुझ्या सत्संगातील आम्हांस लाभलेल्या गुणवत्तेमुळे आमच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध समाजकार्य व साहित्यिक विश्वात दरवळत राहिलेला आहे. आपल्या मनाच्या गुलदस्त्यातील सकारात्मक विचारधारांच्या परागकणांचा गुलकंद करण्याची कला आम्ही तुझ्या वैचारिक पातळीच्या निकषांवर जोपासली आहे. यामुळे आमच सारं आयुष्य मधाच्या गोडव्यासम मधुरोत्तम होण्याची प्रेरणा आम्ही तुझ्याकडून पावलोपावली घेत आलेलो आहोत. जीवनात अकस्मात उद्भवलेल्या अडचणीला नजुमानता आपला आत्मविश्वासाच्या विलपॉवरने प्रफुल्लीत कसा ठेवावा हे ही तुझ्या जीवनशैलीकडे पाहून शिकण्या सारखंच आहे. आपला जीवन प्रवाहाचा वेग आनंद यशाचे किनारे दुथडी भरून स्वच्छ मनाच्या प्रवाहाने खळखळता ठेवण्याची हिंम्मत तू आम्हाला दिलेली आहेस. योग्य वेळी या शांत-शितल प्रवाहाला संयमीत ठेवून उथळ प्रवाहाने निर्माण होणाऱ्या भोवऱ्याच्या धोकादायक स्थिती पासून नियंत्रित ठेवत निच्छींत सुखरूप निरामय कस व्हावं हे तुझ्या जीवनाच्या जडण घडणीतील कृतिशिलतेकडे पाहून प्रत्ययास येत. हे उर्जित कवच आम्हाला आमचंही व्यक्तीमत्व फुलविण्यासाठी आदर्श मानांकन होत राहत हे निच्छीतच वास्तव, सत्य आहे. कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा "आदर्श बंधु भरत पुरस्कार-२०२४" या सन्मानाच्या पुरस्काराची निवड झाल्याची आनंदवार्ता समजलेला आणि तो तू आदरपूर्वक स्विकारण्याचा हा आनंददायी क्षण आहे. माझ्या जीवनाची एकाहत्तर वर्षे ओलांडलेल्या वयात हे आयुष्य फुलपाखरांसारखंच आहे, सध्या नागपूर मुक्कामी असलेल्या विनोद बंधूच्या आठवणी भोवती वलयांकित होऊ लागलं आहे. हे मनाचं फुलपाखरू स्वच्छंदाने बागडणार छोट्याशा संवेदनशील स्वरूपाने जणू विनोदच्या स्वभावाचे, त्याच्या कमलपुष्प समान जिवनातील चांगुलपणांचे परागकण वेचणारे हे शब्दसुमन आहे. आपुलकीचा स्नेह-मैत्रीचा विश्वासकभाव जपलेल्या या आमचा लाडका बंधु विनोद जिथे असेल तिथे सामाजिक वलयातही जिव्हाळ्याचे परागकण जुळवून गुलकंद गोडव्याने भोवताल समृद्ध केलेला यशवंत बाण्याचा अविष्कार आहे. आमचे पिताश्री शिक्षक या नात्याने ज्ञानदाते असल्याने बालमनापासूनच झालेले सुसंस्कारासह शैक्षणिक गोडव्याचे बाळकडु मिळालेले आहे. स्वामी रामानंद तिर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाई श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या ज्ञानमंदिरात त्याचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाल्याने त राष्ट्रहिताची समृद्धता मनात आपसकुच लाभलेलीआहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे प्राप्त झालेलं पोस्ट ग्रॅज्युएशन होवून बौद्धिक प्रगल्भता आलेली आहे. जीवनातील प्रसंगरूप मिळालेल्या सत्संगाने वैचारिक ध्येय सिद्धीचा आलेख उंच शिखरावर सफलतेचा यशाचा ध्वज बंधू विनोद याने फडकवला आहे. म्हणूनच विनोद रापतवार यांची "आदर्श बंधु भरत पुरस्कार - २०२४ साठी झालेली निवड ही सार्थ वास्तव्याला गवसणी घालणारा दिपस्तंभ आहे. आपले माता -पिताश्री वत्सला नरहरराव रापतवार यांच्या सुसंस्काराच्या आर्शिवचनाची ही फलश्रुतीच आहे. तुझ्या आयुष्याच्या जडण-घडणीत तुला सकारात्मतक चांगुलपणा दिलेल्या ज्ञात-अज्ञातांची, तुझ्या सक्षम संवेदनशील मनाच्या सद्सदविवेकबुद्धी गुण ग्राहकतेची ही खरी कमाई आहे. याच बरोबर "आदर्श बंधू भरत पुरस्कार " हा नम्रता पूर्वक स्विकारण अर्थात त्याचा सन्मान करण म्हनजेच कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या या पुरस्काराचं पावित्र्य चिरंजीव, चैतन्यात ठेवून या पुरस्काराचं महत्व सदाबहार प्रफुल्लित ठेवणाऱ्या निवड समितीच्या आपल्या भावाच्या स्मृती प्रती गौरवपूर्ण पवित्र परंपरेला ऋणांकित मानवंदना आहे. म्हणूनच अंबाजोगाईच्या रापतवार परिवारा तर्फे प्रातिनिधीक स्वरूपात मी ज्येष्ठ बंधू या नात्याने बंधु विनोद रापतवार यांची या पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित करीत असल्याबद्दल सदर निवड समितीला कौतुकासह धन्यवाद देत आहे.


बंधु विनोद यास बंधुप्रेमाचं हे पावित्र्य अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबरोबरच भारतीय संस्कृतीचा आत्मा "वसुधैव कुटुंबकम" या अर्थाने आपल्या जीवनशैलीतून विश्व बंधुत्व चिरंजीव ठेवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहे. शुभम भवंतु..!

~ @ राजेंद्र रापतवार

साहित्यिक, अंबाजोगाई.

मोबाईल क्रमांक - 98509 86765

============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)