Posts

Showing posts with the label मुंबई

हृदयद्रावक! रुग्णवाहिका चालकावर आली स्वत:च्याच मुलाचा मृतदेह उचलण्याची वेळ; घटना पाहून सर्वच हळहळले

Image
लोकांची जीव वाचवण्याचे काम डॉक्टर ज्याप्रमाणे करतात. त्याचप्रमाणे जखमींना वेळेत रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहीका चालकही आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात. मात्र, इतरांचे प्राण वाचवणाऱ्या एका रुग्णवाहीका चालकासोबत जो प्रकार घडला आहे तो वाचून तुमचे डोळे देखील पाणवतील. मलेशियातील एका रुग्णावाहिका चालकाला रस्त्यावर मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो सवयीप्रमाणे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेला. मात्र, अपघातच्या ठिकाणी जाताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण रस्त्यावर त्याच्याच मुलाचा मृतदेह पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्माईल असं ४९ वर्षीय रुग्णवाहिका चालकाचं नाव असून तो सुंगाई टोंग हेल्थ क्लिनिकमध्ये कार्यरत आहे. इस्माईल यांना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास एक ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. इमरजन्सी कॉलमुळे ते तत्परतेने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी घटनास्थळी असणारी आपल्या मुलाची दुचाकी ओळखली आणि त्यांना आपल्या मुलाचा अपघात झाल्याचं कळालं. मात्र, मुलगा किरकोळ जखमी झाला असेल असं त्यांना वाटलं. पण दुर्दैवाने...