Posts

Showing posts with the label मुंबई (विशेष प्रतिनिधी)

बार्शीचे सुपुत्र अमित देशमुख यांनी उंचावली महाराष्ट्राची मान विविध रेकॉर्ड्सने झाला सन्मान ; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार केले नावावर

Image
 बार्शीचे सुपुत्र अमित देशमुख यांनी उंचावली महाराष्ट्राची मान  विविध रेकॉर्ड्सने झाला सन्मान ; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार केले नावावर मुंबई (विशेष प्रतिनिधी) केवळ 38 सेकंदात विविध रेकॉर्ड्स आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर करून बार्शीचे सुपुत्र अमित रवींद्र देशमुख यांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे. देशमुख यांच्या या उल्लेखनिय दमदार कामगिरीचे वेळोवेळी कौतुक झालेले आहे. देशातील युवा पिढीसाठी अमित देशमुख हे आयकॉन ठरले आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्याचे सुपुञ असणारे अमित रवींद्र देशमुख हे एक धाडसी, जिद्दी आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी समर्पित युवा व्यक्तिमत्व आहे. तशी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. यापूर्वी त्यांनी विविध रेकॉर्ड्स करून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. आपल्या दमदार व अनोख्या कामगिरी विषयी लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कशी बोलताना अमित देशमुख यांनी सांगितले की, मी अमित रवींद्र देशमुख (रा.बार्शी,जि.सोलापूर) येथील रहिवाशी असून सध्या उद्यमनगर, पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी वास...