बार्शीचे सुपुत्र अमित देशमुख यांनी उंचावली महाराष्ट्राची मान विविध रेकॉर्ड्सने झाला सन्मान ; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार केले नावावर



 बार्शीचे सुपुत्र अमित देशमुख यांनी उंचावली महाराष्ट्राची मान 

विविध रेकॉर्ड्सने झाला सन्मान ; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार केले नावावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) केवळ 38 सेकंदात विविध रेकॉर्ड्स आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर करून बार्शीचे सुपुत्र अमित रवींद्र देशमुख यांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे. देशमुख यांच्या या उल्लेखनिय दमदार कामगिरीचे वेळोवेळी कौतुक झालेले आहे. देशातील युवा पिढीसाठी अमित देशमुख हे आयकॉन ठरले आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्याचे सुपुञ असणारे अमित रवींद्र देशमुख हे एक धाडसी, जिद्दी आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी समर्पित युवा व्यक्तिमत्व आहे. तशी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. यापूर्वी त्यांनी विविध रेकॉर्ड्स करून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. आपल्या दमदार व अनोख्या कामगिरी विषयी लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कशी बोलताना अमित देशमुख यांनी सांगितले की, मी अमित रवींद्र देशमुख (रा.बार्शी,जि.सोलापूर) येथील रहिवाशी असून सध्या उद्यमनगर, पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे. मी 28 जानेवारी 2020 ला 100 ते 0 हे रिव्हर्स आकडे फक्त 38 सेकंदात म्हणले आहेत. ज्याची नोंद आसाम बुक, जिनिअस नायजेरिया बुक, ओएमजी ओह माय गॉड यांच्यासह कित्येक न्यूजपेपर, सोशल मीडिया, पुणे मिरर यांनी घेऊन वेळोवेळी गौरवांकीत केलेले आहे. तसेच मी स्वतः एनएलपी हिलर, रेकी प्रॅक्टिशनर्स आणि एक ट्रेनर आहे. मी स्वतः आग खाऊ शकतो, सुई आर पार घुसवू शकतो. काच तसेच आगी वरून चालू ही शकतो. बोटातून स्ट्रॉ आरपार घालू शकतो. चमचा बेंड करू शकतो. जे माझ्यासाठी सगळे सहज व शक्य आहे. त्यामुळेच मी माझ्या 11 गोल पैकी 4 सहज अचिव्ह ही केले आहेत. हे सामर्थ्य आज सगळ्यांमध्ये आहे. आणि ती एक आंतरिक शक्ती आहे, जी बाहेर काढणे, भीती घालवणे. हे मी सर्व काही करू शकतो. या जगात काहीच अशक्य नाहीये. असे मी आजच्या तरूण पिढीला शिकवून सहज ट्रेन करू शकतो. यासाठी सरकार आणि आपल्या राजकीय नेते मंडळी यांनी माझ्या कामगिरीची योग्य ती दखल घ्यावी, फक्त नेतृत्व (लीड) करण्याची मला एकदा संधी देवून विश्वास दाखवावा, अशी संधी दिली तर आपण या भारत देशाचे नांव अगदी उच्च स्तरावर सहज नेवू शकू. आणि आपले मूळ गाव, राहायचे ठिकाण, सोसायटी, आजू बाजूचे लोक, महाराष्ट्र, देश, वर्ल्ड, प्लॅनेट, अर्थ आणि युनिव्हर्स यांचा योग्य तो नांवलौकिक करू शकू असा सार्थ विश्वास अमित रवींद्र देशमुख (इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर,एनएलपी) यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड