अंबाजोगाईत भीमसेन लोमटे यांच्या इफ्तार पार्टीतून सामाजिक सलोख्याचे दर्शन



अंबाजोगाईत राष्ट्रीय एकात्मता, समता आणि बंधुता अबाधित ठेवण्यासाठी भीमसेन लोमटे यांच्याकडून सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन 

=============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) 

शहरात भीमसेन लोमटे मित्र मंडळ व नवाब परिवाराकडून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव तसेच ईद-ए-मिलाद असे सण सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अंबाजोगाई शहरात राष्ट्रीय एकात्मता, समता आणि बंधुता अबाधित ठेवण्यासाठी भीमसेन लोमटे हे सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यावर्षी ही मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर रोजा इफ्तारचे आयोजन करून सामाजिक सलोख्याचे दर्शन दिले. लोमटे (नवाब) यांच्या रोजा इफ्तार कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वधर्मीय समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जगात कुठे काही झाले तरी त्याचे वाईट पडसाद अंबाजोगाई शहरात उमटत नाहीत. प्रत्येकवेळी अंबानगरीत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडते हे विशेष होय. अंबाजोगाई शहरांमध्ये पुर्वीपासूनच विविध क्षेत्रात कार्यरत लोमटे (नवाब) परिवाराकडून बांधिलकी जोपासत कार्य करण्यात येते. सतत सामाजिक जाणीव उराशी बाळगून, बंधुत्वाची भूमिका घेवूनच कार्य करते, याची जाण ठेवून लोमटे (नवाब) परिवारातील आजची नविन पिढीही कुटुंबाचा वारसा जोपासत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे, हिंदू - मुस्लिम - आंबेडकरी समाजातील मित्र परिवार यासह सर्वधर्मीय समाज बांधवांना सोबत घेऊन आज लोमटे (नवाब) परीवार सामाजिक, शैक्षणिक, विधी, क्रीडा, राजकीय, शेती, उद्योग व्यवसाय या क्षेत्रात काम करीत आहे. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते भीमसेन लोमटे (नवाब) यांनी दरवर्षी प्रमाणेच यावर्षी ही मुस्लिम समाज बांधवांसाठी बुधवार, दिनांक 19 एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास सर्वधर्मीय समाज बांधवांसह माजी आमदार पृथ्विराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, आयुब भाई, दाजिसाहेब लोमटे, माजी नगरसेवक महादेव आदमाने, ऍड.अजित लोमटे, राजवर्धन दौंड, ऍड.उस्मानी साहेब हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांसह सर्वधर्मीय समाज बांधवांचे सहर्ष स्वागत लोमटे (नवाब) परिवाराकडून करण्यात आले. तसेच यावेळी हारूणभाई बागवान, इम्रानभाई बागवान, जुबेर बागवान, शहानवाज बागवान, मालु जोगदंड, किशोर पाटोळे, गणेश सोळंके, ऋषी नरसिंगे, सोहेल पठाण, अहमद सय्यद, रसूल पठाण, अफसर पठाण, अफसर बागवान, अमन शेख, इम्रान पठाण, साबिर पठाण, नूर बाबा बागवान, सादिक बागवान, अली सय्यद, अरबाज पठाण, वसीम शेख, सारेक बागवान, अन्वर शहा, मोईन भाई बागवान मित्र मंडळ, इम्रानदादा शेख मित्र मंडळ, अमेरदादा शेख मित्र मंडळ व एम.जे ग्रुप यांच्यासह सर्व मित्र परिवाराने सहकार्य केले. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भीमसेन लोमटे म्हणाले की, सर्वधर्मीय इफ्तार पार्टीतून समाजात एक वेगळा संदेश गेला आहे. सध्या मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात एकीकडे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना ही अंबानगरीत मात्र सर्वधर्मीय समाज बांधवांना एकत्रित करून सामाजिक सलोख्याचा मौलिक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. शहरात सर्वच सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात. गावात एकता आणि बंधुता राखून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते. आणि विशेष म्हणजे सर्व जण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी घेतात. त्याच अनुषंगाने लोमटे (नवाब) परिवाराकडून बुधवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वधर्मीयांनी आपापसांत समन्वय ठेऊन बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असा संदेश ही या कार्यक्रमातून देण्यात आला. बीड जिल्ह्यात शांतता टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे भीमसेन लोमटे यांनी सांगितले.सायंकाळी रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पोपहार घेतला. इफ्तार पार्टीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.

================================================


Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)