वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने लालनगर व क्रांतीनगर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमोल हातागळे यांचा पुढाकार

===============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अंबाजोगाईत जयंती साजरी करण्यात आली. अंबाजोगाई शहरातील लालनगर आणि क्रांतीनगर भागात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले.

वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमोल हातागळे यांच्या पुढाकाराने आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी देवीदास बचुटे व ज्येष्ठ नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तर श्रीमती कामाबाई घनघाव व जयश्री घनघाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर उपस्थित सर्वच अनुयायांनी महामानव डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आशाबाई सोनवणे, श्यामल घनघाव, उर्मिला पाटोळे, पुष्पा सोनवणे व, रूक्मिणीबाई भोसले, कौशल्याबाई सरवदे, उषाताई आदमाने, सावित्रीबाई हजारे, राधाबाई शेवाळे, उर्मिला घनघाव, पलिंका घनघाव, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमोल हातागळे, तालुकाध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा महासचिव अक्षय भुंबे, अविनाश घनघाव, परमेश्वर लांडगे, अशोक मामा सोनवणे, राजाराम कुसळे, अस्लम पठाण तौसिफ शेख, संतोष उजगरे, सुशिल गायकवाड, राहुल हजारे, बालाजी शेवाळे, विजय शेवाळे, बबलू सरवदे, गोविंद सरवदे, प्रकाश हातागळे, समाधान थोरात, अजय वाघमारे, आश्रफ बागवान, करण घनघाव, जितेंद्र सोनवणे, स्वप्नील कांदे, अमोल भोसले, दयानंद घाडगे, विकी घनघाव, दादा इंगळे, किशोर घाडगे, राजू इंगळे, संकेत हातागळे, भैय्या मस्के, स्वप्नील हातागळे, अतिष सरवदे, शिवाजी सोनवणे, निखिल गायकवाड, उत्कर्ष हातागळे, प्रशांत ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जयंती उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लालनगर व क्रांतीनगर येथील आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, युवकवर्ग, अनुयायी आणि वंचित बहुजन युवा आघाडी यांनी पुढाकार घेतला.

===============================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)