आई सेंटर मध्ये नव्या पिढीने सांगितले 'माझ्या जीवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांनी काय योगदान दिले आहे..?



आई सेंटर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

==============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला पूर्णपणे झोकुन देत 'ज्ञानाचे अथांग महासागर' ठरलेले तसेच पूर्ण विश्वातून 'ज्ञानाचे प्रतीक' म्हणून ओळखले जाणारे महामानव तथा बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्राप्त विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

आई सेंटर कॅंपस, संत सावतामाळी नगर, अंबाजोगाई येथे 'माझे बाबासाहेब : माझ्या जीवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काय योगदान दिले आहे.?' या विषयावर सर्व आई सेंटरचे फॅमिली मेंबर्स यात 'ग्रुप ए'- पहिली ते चौथी, 'ग्रुप बी'-पाचवी ते सातवी, 'ग्रुप सी'- आठवी ते दहावी, तसेच 'ग्रुप डी'- अकरावी ते पदवीधर व पदव्यूत्तर पदवी अशा सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी प्रत्येकाच्या आयुष्यात व त्यांच्या जडणघडणीसाठी दिलेले योगदान याबद्दल भरभरून कृतज्ञता व्यक्त केली व यापुढे स्वतःही खूप अभ्यास करून आपण निवडलेल्या क्षेत्रात टॉपला पोहोचण्याचा निर्धार ही केला. कार्यक्रमाची सुरूवात संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे शांतिदूत तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सामूहिक बुद्ध वंदना घेऊन झाली. यावेळी नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी सुपरिचित असलेले तसेच विद्यार्थी व पालकांच्या विश्वासास निकालातूनच आपले कार्यकर्तत्व सिद्ध करत असलेले 'इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर" अर्थात 'आई सेंटर' येथील स्वतःला परिपूर्ण बनविण्यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य, स्टेज करेज सादरीकरण, मुलाखत कौशल्य, लीडरशिप प्रोग्राम व एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे तसेच "द डायनामिक टॉप रँकर" बनण्यासाठी प्रशिक्षण घेत असलेले विविध बॅचेस मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी तसेच या चर्चासत्रा मध्ये सहभागी झालेले इंजि.प्रतीक गौतम, इंजि.रोहित कोंबडे, इंग्रजीतील दैनंदिन वापरातील 3600 वाक्य लिहिणारी निकिता वैरागे, पौर्णिमा विर्धे, सार्थक भिसे, यशस्वी सुरवसे, शौर्य पवार, प्रियंका जायमात्रे, श्रद्धा शेंगोळे, ओमराजे पवार या गुणवंतांना विविध बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.


===========================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)