शेती प्रश्नांची जाण असणारे व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार..!
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले
==============================================
"विदर्भातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती आमदार नानाभाऊ पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केलेली निवड पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण, जेव्हापासून आमदार नानाभाऊ हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. तेव्हापासून राज्यात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आगामी काळात शेती प्रश्नांची जाण असणारे व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यात कोणतीही शंका नाही."
================================================
महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहिल्यास काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद आ.नानाभाऊ पटोले यांच्याकडे देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. हे आज प्रखरपणे जाणवू लागले आहे. कारण, आ.नानाभाऊ पटोले हे कुणबी (ओबीसी) समाजातून येतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते कायमच आक्रमक ही असतात. एवढेच नव्हे, तर आणखी ही कारणे आहेत. आ.नानाभाऊ पटोलेंच्या निवडीने राज्यात मागील काही दिवसांपासून काॅंग्रेस पक्षाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आ.नानाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जेवढ्या पोटनिवडणूका झाल्या आहेत. त्यात काॅंग्रेस पक्षाने विजय संपादन केला, भाजपाकडून जागा खेचून आणल्या, यामुळे दिवसेंदिवस काॅंग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या बळकट होत आहे. अनेक मान्यवर व मातब्बर नेते, कार्यकर्ते काॅंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. ज्या दिग्गज नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लजी पटेल यांना लोकसभेत पराभूत करून 'जायंट किलर' ठरलेले आ.नानाभाऊ यांनी विद्यमान पंतप्रधान मोदी हे शेतकरी विरोधी आहेत, अशी जाहीर टीका करीत सत्तेत असलेल्या भाजपचा राजीनामा देत काँग्रेस मध्ये परतणारे आ.नानाभाऊ यांनी लोकप्रिय भाजप नेते नितीनजी गडकरी यांना ही त्यांच्याच होमपीचवर घाम फोडलाय हे काही साधे व सोपे काम नाही. महाराष्ट्रातील आक्रमक नेता म्हणून आ.नानाभाऊ पटोले हे संपूर्ण देशात ओळखले जातात. नानाभाऊ यांचे वय सध्या साठीच्या आत आहे. राजकारणात ज्या वयात महत्त्वाची पदं मिळतात, ते पाहता नानाभाऊ हे काही फार वयस्कर आहेत, असे म्हणण्याचे धाडस करता येणार नाही. त्यामुळे राजकीय वयाच्या तुलनेनं त्यांना आज ही तरूणच म्हणता येईल. त्यांच्या या 'राजकीय तरूणपणा'ला त्यामुळेच की, काय आक्रमकतेची जोड असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आ.नानाभाऊ पटोले यांच्यातील 'आक्रमक राजकीय नेता' कसा असावा हे अनेकदा पाहावयास मिळाले आहे. सन
२०१४पूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नानाभाऊ पटोले यांनी भंडारा-गोंदियातून लोकसभा लढवली. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या प्रफुल्लजी पटेल यांना पराभूत करून ते 'जायंट किलर' ठरले होते. मात्र, पुढे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसल्याचं म्हणत भाजपलाही त्यांनी राम-राम ठोकला. विशेष म्हणजे, देशभरात भाजपच्या प्रभावाची लाट असताना, भाजपचा राजीनामा देणारे ते पहिला खासदार ठरले आहेत. नानाभाऊ पटोले हे भाजप मधून स्वगृही म्हणजेच काँग्रेस मध्ये परतल्यानंतर महाराष्ट्र भाजपला ही शेतकरी प्रश्नांवरून त्यांनी धारेवर धरलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रा काढली, तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी आ.नानाभाऊ पटोले यांनी 'महापर्दाफाश' अशी यात्रा काढली होती हे कोण विसरेल. 'महापर्दाफाश' यात्रेतून तेव्हा आ.पटोले यांनी केलेली एक टीका खूपच चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेदरम्यान नाना पटोले म्हणाले होते, "भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासनं देण्यात येतात. त्याची पूर्तता होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. स्वतंत्र भारताच्या ७० वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान देशाने आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले नाहीत." आमदार नानांमधील आक्रमक चेहरा वेळोवेळी समोर आला आहे. या आक्रमक चेहऱ्याचा आता काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या आधीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे व्यक्तिमत्त्व हे फार मवाळ होते, त्या तुलनेत तर नानांचे व्यक्तिमत्त्व हे अधिक आक्रमक असल्याचे काँग्रेसजन ही खाजगीत मान्य करतात. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी सुप्रीम कोर्टात असला, तरी महाराष्ट्राच्या राजकारणातून तो बाजूला सारला गेला नाहीये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे किमान 'नेरेटिव्ह'च्या पातळीवर तरी. राष्ट्रवादीची आधीच प्रतिमा ही 'मराठावादी' आहे. भाजपची वाढच मुळात ओबीसी समाजाच्या पाठबळावर अधिक झालीय. आजच्या स्थितीला भाजप जेवढं मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरेल, तितका ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. मग, या ओबीसी समाजाला राज्यव्यापी पक्षाचा आधार कोणता, तर तो अपरिहार्यपणे काँग्रेस दिसतो. इथं शिवसेना, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे मतदार बांधलेले दिसून येतात, असंही राजकीय विश्लेषकांना वाटतं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बिथरलेल्या ओबीसी समाजाला काँग्रेस हा पर्याय वाटणं सहाजिकच आहे. त्यात प्रदेशाध्यक्षही ओबीसी समाजातील असल्यास हा मार्ग अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे असे वाटते. तर दुसरीकडे, जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावेळी आ.नानाभाऊ पटोले यांनी ओबीसी समाजात आपली प्रतिमा 'आपला नेता' म्हणून तयार केली आहे. विधानसभा सभागृहात तत्कालीन काही मोठ्या नेत्यांचा दबाव झुगारून जातनिहाय जनगणना करावी, असा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यासाठी मंजूर करून घेतला. यावेळी त्यांना छगन भुजबळांनी मोठी साथ दिली खरी. पण, नानाभाऊ पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरून ही कमाल करून दाखवली, अशी भावना ओबीसी समाजात पसरली आहे. आता जातनिहाय जनगणनेसाठी ज्यावेळी ओबीसी समाजाचे मेळावे होतात, तेव्हा आ.नानाभाऊ पटोले यांचे आवर्जून आभार मानले जातात. २०१४ च्या निवडणुकीआधी नानाभाऊ हे काँग्रेस सोडून भाजप मध्ये गेले. भाजपमधून त्यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभा लढवली आणि जिंकले, मात्र, नंतर काही महिन्यांतच ते पुन्हा काँग्रेस मध्ये आले. भाजप सोडताना त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जाहीर टीका केली आणि या टीकेचे केंद्र होते "शेतकऱ्यांचे प्रश्न" भाजप हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हा "शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा अभ्यासू नेता, अशी आ.नानाभाऊ पटोलेंची ओळख आहे," असं मत काँग्रेस नेते पृथ्विराज चव्हाण यांनी व्यक्त केलं होते. ते म्हणने आज खरे असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जेव्हा आ.नानाभाऊ पटोले यांचे नांव जाहीर झाल्यानंतर पृथ्विराज चव्हाण हे पुन्हा एकदा म्हणाले होते, "नानाभाऊ पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारे नेते आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रूपाने शेतकऱ्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील." पुढे पृथ्विराज बाबा यांचे म्हणणे अगदी खरे ठरले. आमदार नानाभाऊ पटोले हे शेती प्रश्नी केवळ महाराष्ट्रातच परिचयाचे नाहीत, तर देशव्यापी संघटनेचा त्यांना मोठा अनुभव आहे. काँग्रेसच्या कृषिविषयक संघटनेचे म्हणजेच ऑल इंडिया किसान काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंजाब - हरियाणा पासून सर्वत्र भारतातील शेतकरी नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. या गोष्टींचा कृषिप्रधान आणि ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखण्यासाठी काँग्रेसला फायदा होण्याची दाट शक्यता विविध क्षेत्रातून वर्तवली जातेय. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तेव्हापासून विदर्भातील नेत्यांचीच नावं पुढे आली. म्हणजे आधी विजय वडेट्टीवार आणि नंतर नानाभाऊ पटोले. विदर्भातील नेत्यांची नावं पुढे येण्याला कारणं विधानसभा निवडणुकीच्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात दडली आहेत. २०१९ च्या विधानसभेला काँग्रेसला सर्वाधिक यश हे विदर्भातूनच मिळाले. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. विदर्भात वर्षानुवर्षे काँग्रेसने वर्चस्व अबाधित राखले होते. मात्र, २०१४मध्ये ही पकड सैल झाली. २०१९मध्ये मात्र पुन्हा आशादायी चित्र निर्माण झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेसने विदर्भात महत्त्वाची मंत्रिपदंही दिली. विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री, तर नानाभाऊ पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. विदर्भाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काँग्रेसनं केलेला प्रयत्न म्हणूनही नानाभाऊ पटोले यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. विदर्भात ओबीसी मतांची टक्केवारी ही परिणामकारक मानली जाते. अशावेळी नानाभाऊ पटोले यांच्यासारखा विदर्भातील ओबीसी नेता असा दुहेरी फायदा असणारा प्रदेशाध्यक्ष देणं हे काँग्रेसला जास्त सोयीचं आणि फायद्याचं ठरेल, असं म्हटलं जातं ते काही उगीच नाही. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे एकास एक दिग्गज नेते आणि मोठमोठी मंत्रिपदं भूषवलेले नेते असल्यानं नानाभाऊ पटोले हे त्यांना कसं सोबत घेऊन जातात आणि बेरजेचे राजकारण करतात, हे आगामी काळात दिसून येईल.त्यामुळेच भविष्यात अभ्यासू, कुशल संघटक, आक्रमक, ओबीसी चेहरा आणि शेती प्रश्नांची जाण असणारे व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार..! यात कोणतीही शंका नाही. नानाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सदिच्छा व शुभेच्छा..!
शब्दांकन - गणेश बिभीषण गंगणे
(तालुकाध्यक्ष, किसान काॅंग्रेस अंबाजोगाई.)
===============================================
(लेखातील मजकूर व व्यक्त केलेली मते ही त्यांची स्वतःची आहेत. संपादक या मतांशी सहमत असेलच असे नाही - संपादक लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क.)
Comments
Post a Comment