आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थी व पालक यांना समतादूत यांच्याकडून ऍडमिट कार्डचे वाटप व मार्गदर्शन
प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सहकार्य
=============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
अंबाजोगाई तालुक्यातील अनेक मुलांचे ऍडमिट कार्ड डाऊनलोड करून भरलेल्या फॉर्मची व हमीपत्र तसेच ॲडमिट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. तसेच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सहकार्य करीत आहेत.आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थी व पालक यांना भेटून समतादूत यांच्याकडून ऍडमिट कार्डचे वाटप व मार्गदर्शन करीत आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, अंतर्गत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, निबंधक अस्वार मॅडम व बार्टीचे विभागप्रमुख सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत यांच्याकडून विविध योजनेचा प्रसार व प्रचार व त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळावा यासाठी सतत कार्य सुरू असते. त्या अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यामध्ये समतादूत तथा पत्रकार व्यंकटेश जोशी यांच्याकडून आरटीईची माहिती प्रसार व प्रचार करून मोफत ऑनलाईन फॉर्म भरून देण्यात आले होते. आता निवड प्रक्रियामध्ये निवड झालेल्या पाल्यांचे निवड पत्र पालकांना वाटप करण्याचे कार्य समतादूत करीत आहेत. त्या अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक मुलांचे ऍडमिट कार्ड डाऊनलोड करून भरलेल्या फॉर्मची व हमीपत्र तसेच ॲडमिट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. तसेच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सहकार्य करीत आहेत.
=================================================
Comments
Post a Comment