स्वराज्यप्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे, सौरभदादा खेडेकर यांच्या उपस्थितीत ॲड.माधव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन ; शोभायात्रेचे आयोजन
जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी परळीत सुरू होणार 'माधव भवन' ; परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते ॲड.माधव (आप्पा) जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
=============================================
परळी वैजेनाथ / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे, सौरभदादा खेडेकर हे परळीच्या दौऱ्यावर येणार आहेत. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे परळी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते ॲड.माधव (आप्पा) जाधव यांच्या संपर्क कार्यालय भव्य उद्घाटनाचा सोहळ्याचे आयोजन रविवार,दि.३० एप्रिल रोजी करण्यात आले असून यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या हालगे गार्डन येथे सुरू असून संपूर्ण परळी विधानसभा मतदारसंघासह परळी शहर आणि परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले आहे. मोंढा परिसरात असलेल्या माधव भवन येथे ॲड.माधव जाधव मित्र मंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा विधीज्ञ ॲड.माधव जाधव यांच्या नावाने मित्र मंडळाचे संपर्क कार्यालय परळी येथे सुरू होत आहे. या कार्यालयाचे उद्घाटन स्वराज्य प्रमुख युवराज तथा माजी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या शुभ हस्ते मोंढा परिसरात माधव भवन येथे कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, उदघाटन कार्यक्रमाआधी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले गेले आहे. वैद्यनाथ कॉलेज समोरून या रॅलीला सुरूवात होणार असून पुढे मौलाना अबुल कलाम आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन परिसर, स्टेशन रोड, गोलाई, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक, या मार्गे हालगे गार्डन येथे पोहचणार आहे. हालगे गार्डन येथे मान्यवरांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर वाघमोडे (माजी सभापती जि. प.समाजकल्याण, बीड.) हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव मुंडे, रिपाइं आठवले गटाचे नेते महेंद्र निकाळजे, शिवक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ गव्हाणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे,एम.आय.एमचे तालुकाध्यक्ष शेख शरीफ भाई, शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश हालगे, मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांची उपस्थिती असणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला परळी शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड.माधव जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
=======================================
Comments
Post a Comment