भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अंबाजोगाईत २२ आणि २३ एप्रिल रोजी प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन
================================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त या वर्षीही २२ आणि २३ एप्रिल २०२३ रोजी दोन दिवसीय प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमालेचे ठिकाण योगेश्वरी नूतन विद्यालय (प्राथमिक विभाग) प्रशांतनगर, अंबाजोगाई (जि.बीड) हे आहे. अशी माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
अंबाजोगाईत मागील ३१ वर्षांपासून कार्यरत असलेली सर्वांत जुनी व सन २००२ साली शासनाकडे अधिकृतरित्या नोंदणीकृत झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकीत व्याख्यात्यांना निमंत्रित करून प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त २२ आणि २३ एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित दोन दिवसीय प्रबोधनपर व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते सहभागी होणार आहेत. शनिवार, दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित व्याख्यानमाला पुष्प पहिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सिध्देश्वर बिराजदार (औषधशास्त्र विभागप्रमुख, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.) हे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डाॅ.सुधीर अनवले (प्रदेश नेते, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना) हे लाभले आहेत. ते "जाती अंताचा लढा आणि फुले - आंबेडकरवाद" या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत. तसेच रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित व्याख्यानमाला पुष्प दुसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भास्कर खैरे (अधिष्ठाता, स्वा.रा.ती.वै.महा.व रूग्णालय, अंबाजोगाई) हे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.उमेश बगाडे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) हे लाभले आहेत. ते "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्य विषयक विचार" या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत. तरी अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी दोन दिवसीय प्रबोधनपर व्याख्यानमालेस उपस्थित रहावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्याकडून करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी समितीचे डॉ.श्रीहरी नागरगोजे (अध्यक्ष), ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.एस.के.जोगदंड (उपाध्यक्ष), लंकेश वेडे (कार्याध्यक्ष), भगवानराव ढगे (सचिव), प्रा.गौतम गायकवाड (सहसचिव) तसेच एॅड.मीर महाजेर अली उस्मानी, ज्येष्ठ विधीज्ञ एॅड.बाबुराव तिडके, काॅ.बब्रुवाहन पोटभरे, शिवाजी खोगरे, संभाजी सातपुते, व्यंकट वेडे, सुखदेव भुंबे, एकनाथ टोनपे, प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे, विजयाताई कांबळे, ज्ञानोबा रोकडे यांच्यासह सर्व सन्माननिय कार्यकारीणी सदस्य यांनी पुढाकार घेतला आहे.
================================================
Comments
Post a Comment