अतिवृष्टी अनुदानातून वगळल्यास अंबाजोगाई तालुक्याच्या पाटोदा महसूल मंडळातील शेतकरी तीव्र आंदोलन करणार - काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख



जुलै ते ऑक्टोबर - 2022 या महिन्यांत अतिवृष्टीमुळे पाटोदा महसूल मंडळातील शेतक-यांचे झाले नुकसान

===============================================

अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

जुलै ते ऑक्टोबर - 2022 या महिन्यांत अतिवृष्टीमुळे पाटोदा महसूल मंडळातील शेतक-यांचे काढणीस आलेल्या पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व अनुदान मिळावे याबाबत आपण प्रयत्नशील आहोत, जर अतिवृष्टी अनुदानातून वगळले तर अंबाजोगाई तालुक्याच्या पाटोदा महसूल मंडळातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा बीड जिल्हा काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, जुलै ते ऑक्टोबर - 2022 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबाजोगाई तालुक्यासह पाटोदा महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे 100 टक्के नुकसान झाले. परंतु, या शेतकऱ्यांना अद्याप ही शासनाकडून कसली ही मदत मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईचे अनुदान व पिक विमा मिळावा या मागणीसाठी आपण कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर साहेब, जिल्हाधिकारी, बीड आणि अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना बोललो आहोत, तसेच यापूर्वी शेतकऱ्यांचे वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे अनेक वेळा निवेदने देऊन ही कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. पाटोदा महसूल मंडळातील पाटोदा, देवळा, ममदापूर, अंजनपूर, कोपरा, आपेगाव, तट बोरगाव, धानोरा (खुर्द), हिवरा, सोमनाथ बोरगाव, माकेगाव, नांदडी, कोळकानडी, डिघोळ अंबा या 14 गावातील शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाईचे अनुदान व पिक विमा मिळावा या मागणीसाठी सदरील गावातील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2023 रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण उपजिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे केले होते. या आंदोलनात सदरील 14 गावचे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुलै ते ऑक्टोबर 2022 महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतक-यांचे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मका इत्यादी काढणीस आलेल्या पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान व 100 टक्के पिक विमा द्यावा म्हणून दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी उपजिल्हाधिकारी यांना पाटोदा (म.), (ता.अंबाजोगाई) येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. सततच्या अतिवृष्टीमुळे व झालेल्या पावसाने सर्व पिके वाया गेल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील व पाटोदा (म.) महसूल मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एक लाख रूपये मदत द्यावी. शेतक-यांच्या पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्यामुळे 100 टक्के पिक विमा द्यावा., शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे., ई - पिक पाहणी ही जाचक अट रद्द करावी.,धानोरा येथील ३३ के.व्ही.उपकेंद्रातून अखंड वीज मिळावी, भारनियमन रद्द करावे. अन्यथा या सर्व प्रश्नांची सोडवणूक नाही झाली तर प्रसंगी पाटोदा महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची राज्य सरकारने नोंद घ्यावी, या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासन व बीड जिल्हा प्रशासन यांची राहील असा इशारा बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला आहे.

================================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)