नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पारंपारिकतेला तंत्रज्ञानाशी जोडणारे - डॉ.प्राची साठे
खोलेश्वर शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विशेष मार्गदर्शन
=======================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे खऱ्या अर्थाने भारताला विश्व गुरूत्वाकडे घेऊन जाणारा एक प्रभावी मार्ग असून या मार्गावरून जात असताना, 'समृद्ध शिक्षक घडावेत त्या माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडतील ' यासाठी पारंपारिक गुरूकुल शिक्षण पद्धती बरोबरच मोबाईल, संगणक पर्यायाने अंतर्जाल यांच्या वापरातून तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन पद्धतींचा समावेश अध्यापनात हावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका तथा ज्येष्ठ लेखिका डॉ.प्राची साठे यांनी केले.
येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर' विशेष मार्गदर्शनावेळी त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात गुरूकुल पद्धतीप्रमाणे नाते निर्माण होणे आवश्यक आहेत. याद्वारेच त्यांच्यातील नाते समृद्ध होईल. विद्यार्थ्यांना चांगलं घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांचीच आहे. पाठ्यपुस्तके ही केवळ दिशादर्शकाचे काम करतात तर शिक्षक हे मूल्याधिष्ठित, सुसंस्कारी, राष्ट्रप्रेमी विद्यार्थी घडविण्याचे काम करतात.यापुढे विशेष करून शिक्षकांनी गृहपाठांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर तर करावाच शिवाय इतर विषयांच्या सहभागातून त्याचबरोबर वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास व संवर्धन व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आधी आपले कार्य समजून घ्यावे ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नभाताई वालवडकर यांनी अध्यक्ष समारोपात उपस्थित शिक्षकांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध पैलूंचा सर्वांकष अभ्यास करून त्यांना आपल्या दैनंदिन अध्यापन प्रक्रियेमध्ये लवकरात लवकर समावेश करून त्याद्वारे आपल्या संकुलातील प्रत्येक विद्यार्थी सक्षम होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र साठे, केंदीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, आप्पाराव यादव, अविनाश तळणीकर, वर्षाताई मुंडे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष विजय वालवडकर, कार्यवाह बिपीन क्षीरसागर, सी.बी.एस.सी.च्या मुख्याध्यापिका प्रतिभाताई शिंदे, उपमुख्याध्यापक शंकर वाघमारे, पर्यवेक्षक अरूण पत्की, विभागप्रमुख प्रशांत पिंपळे तसेच संकुलाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक बंधु - भगीनी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपनाताई डुकरे यांनी केले, प्रास्ताविक जयश्रीताई इटकुरकर यांनी केले, वैयक्तिक पद्य कल्याणीताई जोशी यांनी सादर केले तर उपस्थितांचे आभार गायत्रीताई संदीकर यांनी मानले.
=============================================
Comments
Post a Comment