अंबाजोगाई क्रेडाईच्या अध्यक्षपदी संजय सुराणा तर सचिवपदी शेख शकील बागवान यांची सर्वानुमते निवड
==============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
अंबाजोगाई क्रेडाईच्या अध्यक्षपदी संजय सुराणा तर सचिवपदी शेख शकील बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
क्रेडाई अबाजोगाईच्या नव्या शाखेची स्थापना करण्यात येवून अध्यक्षपदी संजय सुराणा तर सचिवपदी शेख शकील बागवान, उपाध्यक्षपदी गोरख थोरात आणि कोषाध्यक्षपदी आंनद कर्नावट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र क्रडाईचे अध्यक्षपदी प्रमोद खैरनार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे क्रेडाईच्या नुतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, अतिरिक्त सचिव भूषण गगराणी हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी संजय सुराणा यांना अंबाजोगाईच्या शाखेचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी नुतन सचिव शेख शकील बागवान, क्रेडाईचे कन्टेनर समीर काझी, बीड क्रेडाईचे माजी अध्यक्ष अतुल संघानी, उपाध्यक्ष कबीर भाई, गोरख थोरात व मुस्ताखीम खयामोद्दीन काझी हे उपस्थित होते. आपले पदग्रहण केल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंबाजोगाई क्रेडाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सुराणा म्हणाले की, क्रेडाई संघटनेमध्ये मागील काही वर्षांत आम्ही सर्वजण यांनी मिळून केलेल्या शिस्तबद्ध कामाची पोचपावती म्हणून सर्व सदस्यांकडून आपली एकमताने अध्यक्षपदी निवड करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था असून तिच्या महाराष्ट्रात साठ शाखा आहेत व तीन हजारांहून अधिक सदस्य आहेत. क्रेडाई सदस्य असणे हि एक मानाची बाब असून, सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर क्रेडाईचे विषेश कोड ऑफ कंडक्ट असून त्याप्रमाणे अधिकार व जबाबदारी ही असते, सर्व सदस्यांना याचे पालन करणे बंधनकारक असते. बांधकाम क्षेत्रामध्ये कोणते ही बदल घडवताना, नियम बनवताना शासनाच्या वतीने क्रेडाई संघटनेचे मत विचारात घेतले जाते, क्रेडाई संघटने बरोबर चर्चा ही केली जाते. क्रेडाई संघटनेला बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यामधील दुवा मानला जातो. ग्राहकांची कोणती ही अडचण किंवा तक्रार असल्यास ती न्याय्य पद्धतीने क्रेडाई मार्फत सोडविली जाते. शासकीय नियमानुसार 'रेरा'कडे प्रकल्प नोंदणीकृत करण्यासाठी क्रेडाई सदस्य असणे बंधनकारक आहे. अशी माहिती अंबाजोगाई क्रेडाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सुराणा यांनी दिली आहे. क्रेडाई अंबाजोगाईच्या नुतन कार्यकारणीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
==============================================
Comments
Post a Comment