आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत गरजू विद्यार्थीच वंचित - सामाजिक कार्यकर्ते तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांची माहिती


"आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. दरवर्षी जवळपास हजारावर विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश दिला जातो. शिक्षण शुल्क शासन देत असते." 

============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) 

आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. दरवर्षी जवळपास हजारावर विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश दिला जातो. शिक्षण शुल्क शासन देत असते. मात्र दरवर्षी या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रचंड सावळा गोंधळ होतोय आणि खरे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतात. यावर्षीही असाच प्रकार निदर्शनास येत आहे. लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे असे जरी सांगितले जात असले तरीही यात प्रचंड अफरातफर झालेली आहे. तालुकास्तरावर निवडण्यात आलेल्या समित्यांची खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी असताना त्यांच्या हेतुबाबत ही शंका आहे. निवडण्यात आलेली नांवे खरेच आर्थिक दुर्बल घटकातील आहेत का याचा शोध घेतला तर या यादीची पोलखोल होईल. सर्वसामान्य जनतेच्या करांच्या रूपातून जमा होणारा पैसा अश्या पद्धतीने पुन्हा धनदांडग्यांच्या शिक्षणावर खर्च करून खरे दुर्बल घटकांतील पाल्य वंचित ठेवण्याचा पाप काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. ऑनलाईन आवेदन भरताना अनेक पालकांनी आपला तात्पुरता निवासी पत्ता बदलून आवेदन पत्र भरलेले आहे. दरवर्षी अश्याच पद्धतीने सावळा गोंधळ चाललेला आहे. दरवर्षी निवेदने दिली जातात. पण, पुन्हा तोच प्रकार पाहायला मिळतो. गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यायचेच नाही अश्या पद्धतीने प्रशासनातील काही मंडळी नियोजन करत आहेत. यावर्षी हा डाव आम्ही हाणून पाडू. प्रत्येक प्रवेशाची खातरजमा करूनच प्रवेश दिले जावेत यादीत चुकीच्या माहितीच्या आधारे निवड झालेल्या चुकीच्या नावांचा प्रवेश झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आणि निवड समितीची असेल. आणि योग्य निवड होऊन प्रवेश प्रक्रिया पार पडेपर्यंत व प्रत्येक खऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल. काही शाळा गॅदरिंग, परीक्षा प्रकल्प सांस्कृतिक कार्यक्रम व इतर बाबींसाठी पालकांकडून शुल्क आकारत असतात. आरटीईमधून मोफत प्रवेश झाला असला तरी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित शाळेला शुल्कापोटी पैसे द्यावे लागतात अश्याही काही तक्रारी आल्या आहेत. फुकट प्रवेश वाटत असला तरी शाळेत प्रवेशानंतर विविध माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या आगाऊ शुल्काबाबत प्रशासनाने जागरूक राहावे याबाबत ही वरिष्ठांना निवेदन देण्यात आले आहे.


=============================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)