अंबाजोगाईत एस.टी.आगारप्रमुख अमर राऊत यांचा सत्कार




आगारप्रमुख अमर राऊत यांच्या सत्कारासाठी समाजबांधव मित्र परिवार आणि एस.टी.कर्मचारी यांचा पुढाकार

===========================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई एस.टी.आगारप्रमुख पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर समाजबांधव, मित्र परिवार आणि एस.टी.कर्मचाऱ्यांकडून आगारप्रमुख अमर राऊत यांचा मंगळवार, दिनांक 25 एप्रिल रोजी सत्कार करण्यात आला.

अंबाजोगाई एस.टी.आगारप्रमुख म्हणून अमर दिलीपराव राऊत यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. अमर राऊत हे पूर्वी सहाय्यक वाहतूक अधिक्षक होते. यापूर्वी ही ते अंबाजोगाई आगारात कार्यरत होते. नुकतेच ते अंबाजोगाई आगारप्रमुख म्हणून रूजू झाले. त्यांनी परळी वैजेनाथ आगारातून वाहतूक निरीक्षक म्हणून आपल्या महामंडळातील सेवेला प्रारंभ केला. आत्तापर्यंत त्यांनी अंबाजोगाई येथे वाहतूक अधिक्षक म्हणून ही सेवा बजावली आहे. ते मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे रहिवासी आहेत. 2011 साली ते एस.टी.महामंडळाच्या सेवेत रूजू झाले आहेत. उत्कृष्ट व तत्पर सेवा दिल्याबद्दल त्यांचे जनतेकडून वेळोवेळी कौतुक झाले आहे. मनमिळावू स्वभाव आणि शासन नियमानूसार प्रत्येकाला सहकार्य करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ही आगारप्रमुख अमर राऊत हे सर्वदूर ओळखले जातात. त्यांचा सत्कार अंबाजोगाई आगारात करण्यात आला. सत्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ असे होते. या प्रसंगी गणेश फड, राजाभाऊ मुंडे, व्यंकट फड, आदिनाथ फड, पप्पु भिसे, आतिक भाई, सुनिल कांदे, सचिन गौरशेटे, मनोहर राऊत (सेंट्रल पोलिस), संतोषकुमार राऊत, मयूर रामधामी, सर्जेराव जाधव, प्रशांत पवार, दत्तात्रय सुरवसे, अमोल जाधव, राहुल गायकवाड यांच्यासह समाजबांधव, मित्र परिवार आणि एस.टी.कर्मचारी हे उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना अंबाजोगाई आगारप्रमुख अमर राऊत यांनी सांगितले की, एस.टी.चे उत्पन्न वाढविणे, प्रवाशांना चांगली व दर्जेदार सेवा देणे, वेळापत्रकाप्रमाणे वेळेवर गाड्या सोडणे हे माझ्या सेवेतील महत्वाचे कार्य असेल, बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे आदी प्रश्‍न अंबाजोगाईकरांच्या सहकार्यातून मार्गी लावणार असल्याचे नुतन आगारप्रमुख अमर राऊत यांनी सांगितले.

================================================


Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)