नियमित आरोग्य तपासणी करणे ही काळाची गरज - आमदार सौ.नमिताताई मुंदडा


परशुराम जन्मोत्सवानिमित्त अंबाजोगाईत कॅन्सर जनजागरण रॅलीचे आयोजन

============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

दिवसेंदिवस कॅन्सर च्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे ही काळाची गरज असल्याचे मत आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केले. परशुराम जन्मोत्सवानिमित्त पेशवा प्रतिष्ठान, अस्तित्व महिला संघटन, इंडियन मेडिकल असोसिएशन, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या वतीने कर्करोग जनजागरण रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी आ.नमिताताई मुंदडा या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर सुप्रसिध्द ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे, डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.अर्चना थोरात, सौ.स्वरूपा कुलकर्णी, सौ.कल्याणी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.अर्चना थोरात यांनी मार्गदर्शन करताना स्तनांच्या कॅन्सरनंतर सर्व्हिकल कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, कोलोन आणि रेक्टम आणि लिप अँड कॅव्हिटी कॅन्सरची प्रकरणे सर्वांत जास्त समोर येत आहेत असे सांगितले. "गावं आणि शहरांमध्ये तुलना केली तर गावांमध्ये सर्व्हिकल आणि शहरांमध्ये स्तनाच्या कॅन्सरची प्रकरणे जास्त आढळतात. पण, संपूर्ण भारतातच महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर सगळ्यांत जास्त आढळतो. उशीरा लग्न होणं, उशीरा होणारी गर्भधारणा, स्तनपान कमी करणं, वाढता तणाव, जीवनशैली आणि स्थूलपणा ही या मागची कारणं आहेत" असे त्यांनी नमूद केले. तर डॉ.घुगे यांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. डॉ.अरूणा केंद्रे म्हणाल्या की, कॅन्सर हा कोणाला ही होवू शकतो. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला कॅन्सर पासून दूर राहता येईल. त्यामुळे अश्या जनजागरण रॅलीचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक स्वरूपा कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन निशिगंघा मॅडम यांनी केले, तर सहभागी झालेल्या सर्वांचे आभार डॉ.संकेत तोरंबेकर यांनी मानले. रॅली यशस्वी करण्यासाठी पेशवा प्रतिष्ठानचे राहुल कुलकर्णी, शिरीष हिरळकर, विशाल जहागीरदार, अक्षय पिंगळे, डॉ.संकेत तोरंबेकर, विवेक बाभुळगावकर, गोविंद जोशी, विनय चौसाळकर, गौरव कुलकर्णी, केदार दामोशन, पार्थ कुलकर्णी, ऍड.वैजेनाथ वांजरखेडे, वामन खोत, डॉ.प्रवीण जोशी यांनी पुढाकार घेतला. या रॅलीला शहरातील नामवंत डॉक्टर्स, आशा कार्यकर्त्या, अस्तित्व महिला संघटनेच्या पदाधिकारी, पेशवा प्रतिष्ठानचे सदस्य तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

=======================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)