Posts

Showing posts from December, 2022

ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ व ज्येष्ठ संपादक अशोकराव गुंजाळ यांचा "पञकारीता जीवनगौरव" पुरस्काराने सन्मान होणार

Image
कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार डाॅ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार अभिजीत नखाते यांना जाहीर अंबाजोगाई पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे ६ जानेवारी रोजी वितरण ====================== अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने पञकार संघाचे विश्वस्त प्रा.नानासाहेब गाठाळ आणि अंबाजोगाई पञकार संघाचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ यांना त्यांनी पञकारीता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना "पञकारीता जीवनगौरव पुरस्कार" तसेच अंबाजोगाई पञकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी डाॅ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर (कार्यकारी संपादक,दैनिक पार्श्वभूमी, बीड) तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी अभिजीत नखाते (उपसंपादक, दैनिक लोकाशा, बीड.) यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ संपादकांसह दोन्ही मान्यवर पत्रकारांना दि.६ जानेवारी २०२३ रोजी अंबाजोगाईत दर्पण दिन कार्यक्रमात सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

वंजारी महासंघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराने अंबाजोगाईचे सुनिल सिरसाट सन्मानित

Image
अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) नाशिक येथे रविवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे पहिले एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात साहित्य - कला आविष्कारातील राज्यस्तरीय पुरस्काराने अंबाजोगाई येथील   पत्रकार सुनिल सिरसाट यांना सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल पञकार सुनिल सिरसाट यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे. महाविद्यालयीन जीवनात इतर विषयांसह नाट्यशास्त्र विषय घेऊन पदवी घेतलेल्या सुनिल सिरसाट यांनी स्थानिक पातळीवर, विद्यापीठ स्तरावर आणि राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नाटकांत काम केलेले आहे. शिवाय ते मागील २५-२६ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करीत असताना अंबाजोगाई तालुका स्तरावर ते भाजयुमोचे पदाधिकारी ही राहिलेले आहेत. उत्तम संभाषण कौशल्य आणि रोखठोक स्वभावाचे निर्भीड वक्ते म्हणून ही त्यांची सर्वञ ओळख आहे. तर विशेष म्हणजे मागील १९ वर्षांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्...

सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या भेटीचा दगडूदादा लोमटे यांना झालेला आनंद त्यांच्याच शब्दांत..!

Image
सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या भेटीचा दगडूदादा लोमटे यांना झालेला आनंद त्यांच्याच शब्दांत..! ====================== अरविंद जगताप हे पाडळशिंगी जिल्हा बीड येथील रहिवाशी. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला. आता मुंबई काबीज केली, आहे करीत आहेत. आपल्या आवडीच्या कलेच्या क्षेत्रात आज दूरवर नांव पोहचले आहे. पत्र प्रपंच त्यांनी सुरू केला. अलीकडे व्हाॅट्सॲप व इंटरनेट मुळे मेलवर पत्र जावू लागले. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र हे विसरून गेले. त्याला संजीवनी देण्याचे काम अरविंद जगताप यांनी केले. माझ्या "राहून गेलेली पत्रे" या पुस्तकाला त्यांनी ब्लर्ब लिहिले ते खाली दिले आहे. माझी व त्यांची प्रत्यक्ष भेट काल बीड मध्ये दीपाताई क्षीरसागर यांच्या सेवागौरव कार्यक्रमात झाली. मला फार आनंद झाला. साधी राहणी, स्वभाव मनमिळावू, कुठलाही अभिनिवेश नाही. अशीच प्रगती आपली होवो अशीच निर्मळ प्रार्थना आहे..! लेखक : दगडू लोमटे, (अंबाजोगाई ) 9823009512 ******************** "राहून गेलेली पत्रे" या दगडूदादा लोमटे लिखित पुस्तकासाठी सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप सर (मुंबई) यांनी दिलेला अभिप्राय खास आपल्यासाठी....

मोफत वकील मिळवा अन् कोर्टात केस लढा

Image
मोफत वकील मिळवा अन् कोर्टात केस लढा विधी सेवा प्राधिकरणे करतात मोफत कायदेविषयक मदत वाचा वाचकप्रिय दैनिक लोकमत मधील बातमी...

सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे यांचा चिंतनपर लेख : "संयमाचा परीघ"

Image
सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.मुकूंद राजपंखे यांचा चिंतनपर लेख : "संयमाचा परीघ" मराठी वाचक, रसिकांसाठी....  "वस बुडविणार आहोत का आपण माणुसकी निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा ..?" -------------------------- ■ आपला विरोध कशाला आहे नेमका ?  आपण कुणा विरोधात लढा उभारू पहात आहोत नेमके ? आपला शत्रू कोण आहे नेमका आणि आपला मित्र कोण आहे नेमका ? आपण का लढतो आहोत आपापसातच ? कोणाविरूद्ध आहे आपण बंड पुकारलेले ? तो जो आज याच्या विरुद्ध लढ म्हणून उचाटनी देतो कालांतराने तो त्याच्या भकीला बसलेला असतो. क्षणार्धात बदलत जात आहेत समीकरणं ! आपण ठाम पणे कुणाच्या बाजूनं जायचं ? भुजा आहेत, आपल्याला आहे का मुळात बाजू ? का वागंत असतील माणसं असे ? कोण बदलतो माणसांच्या मनाचा कौल ? हैराण करून सोडणारे प्रश्न आहेत ना ? मुळात हे आहे काय आणि असं का असतं ? इतिहास सांगतो ओरडून याने त्याचे पाय चाटले आणि त्याने त्याचे पाय छाटले. याला सपोर्ट करणारे कोण होते आणि मग त्याची बाजू न्यायाची म्हणणारे कोण होते ? नितीलाही आहेत सपोर्टर्स आणि अनितीचेही आहेत पाठीराखे. आपल्यातल्या कुणाला विचारलं म्हणजे होईल कन्फर्म की कुठली ब...

साहित्यिकांनी शोषणाविरूध्द आवाज उठवावा - संमेलनाध्यक्ष कवी दिनकर जोशी

Image
पाचवे एकता मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन साहित्यातून नवसमाज निर्मिती होते - उद्घाटक आ.विक्रम काळे ======================== अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी- लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) आता साहित्यीकांना गरीब,शोषित आणि वंचितांची भाषा बोलावी लागेल. त्यांचे प्रश्न, वेदना, साहित्य समाजासमोर आणावे लागेल. श्रीमंतांची भाषा ही शोषणाची आहे. शोषणाविरूध्द साहित्यिकच आवाज उठवू शकतात. साहित्यीकांनी ही जबाबदारी पार पाडावी. असे आवाहन संमेलनाध्यक्ष दिनकर जोशी यांनी केले. ते एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात बोलत होते.या संमेलनाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दिनांक 26 डिसेंबर रोजी करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्षपद अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी हे भूषवित आहेत. 26 व 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या संमेलनाचे उद्घाटन शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दिपक नागरगोजे, साहित्यीक अन...

"अंबाजोगाई तरुण महोत्सव - २०२२" अंतर्गत कबड्डी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

"अंबाजोगाई तरुण महोत्सव - २०२२" अंतर्गत सुरू असणार्‍या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  https://fb.watch/hDKNcpkQHq/

"वर्तमानातील भूतकाळाचे संदर्भ आणि भविष्याच्या परिणामांची उकल करणारे : कवी दिनकर जोशी"

Image
एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक 26 आणि मंगळवार, दिनांक 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष कविवर्य दिनकर जोशी यांच्या साहित्य विषयक कार्याची ओळख करून देणारा  प्रस्तुत लेख वाचकांसाठी देत आहोत.   ================ "अंबाजोगाई ही मराठीचे आद्यकवी मुकूंदराज, प्रकांड पंडीत सर्वज्ञ दासोपंत यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी, मराठवाड्याचे पुणे असा ही अंबानगरीचा नांवलौकीक आहे, महाराष्ट्राला नवा विचार आणि दिशा देण्याचे काम या शहराने कायमच केले आहे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व साहित्य क्षेत्रात चळवळीला बळ देण्याचे कार्य अंबानगरीेेचे भुमिपुत्र आज विविध क्षेत्रात अव्याहतपणे करीत आहेत, अंबाजोगाईच्या सशक्त कवितेचा वारसा जोपासण्याचे, पुढे नेण्याचे काम जी काही मोजकी साहित्यिक मंडळी करीत आहेत त्यात दिनकर वासुदेवराव जोशी हे मराठवाड्यातले आघाडीचे कवी म्हणून सर्वदूर ओळखले जातात." दिनकर जोशी हे मराठी भाषेतील एक लोकप्रिय कवी व "साहित्य प्रणाली" ...

मानवलोकच्या वतीने आयोजित अंबाजोगाई तरूण महोत्सव-२०२२ ला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

लोकनायक डिजिटल न्युज नेटवर्कने मिळवली ; मराठवाडास्तरीय कुस्ती स्पर्धेतील क्षणचित्रे खास आपल्यासाठी...

इंडीयन मेडीकल असोसिएशन, अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी डॉ.नवनाथ घुगे तर सचिवपदी डॉ.सचिन पोतदार

Image
इंडीयन मेडीकल असोसिएशन, अंबाजोगाईचे विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी जाहीर केली नुतन कार्यकारिणी ======================= अंबाजोगाई (संपादक : रणजित डांगे) इंडियन मेडीकल असोसिएशनची नूतन कार्यकारिणी सर्वानूमते निवड करून जाहीर करण्यात आली असल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. मागील सात वर्षांपासून संघटनेचे सलग अध्यक्षपद भुषवून विक्रम प्रस्थापित करणारे डॉ.राजेश इंगोले यांनी आपल्यावर सध्या विविध जिल्हा व राज्य समिती पदांच्या विविध जबाबदाऱ्या असल्याने तसेच नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉकटर्स सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याने तसेच वैद्यकीय, सामाजिक कार्यात व्यस्त असल्याने इंडियन मेडीकल असोसिएशनच्या स्थानिक अध्यक्षपदाला वेळ देऊ शकत नसल्याने त्या पदाला भविष्यात न्याय देता येत नसल्याचे सांगत हे पद यापुढे भूषविण्यास विनम्र नकार दिला होता. त्यामुळे सर्व सदस्यांनी सर्वानूमते नविन अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांची निवड करण्यात यावी असे आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना केले होते....

26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन - डॉ.संतोष मुंडे यांची माहिती

Image
डॉ.संतोष मुंडे यांच्या दिव्यांगांसाठीच्या सक्रिय कार्याचे सर्वस्तरांतून कौतुक ======================= परळी वैजेनाथ (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) दिव्यांग, विधवा, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर 26 डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी दिला आहे. डॉ.संतोष मुंडे हे नेहमीच दिव्यांगासाठी सक्रियपणे काम करतात. दिव्यांगासाठी सातत्याने लढा देऊन विविध योजनांचा लाभ त्यांनी दिव्यांगांना मिळवून दिला आहे. सामाजिक भावनेतून प्रामाणिकपणे विविध लोक उपयोगी व उपेक्षित घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचे उपक्रम, आंदोलन ते नेहमीच करतात. फाटलेले, खराब झालेले, जुने, रेशनकार्ड नूतनीकरण असो की, दिव्यांगांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करणे असो या सर्वस्तरावर ते सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहेत. आंदोलनातील मागण्या वरील सर्वांना अंत्यादोय मध्ये (2 ...

मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन : शोभायात्रा व ग्रंथदिंडीने वेधले परभणीकरांचे लक्ष

Image
मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद  ======================= परभणी (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.23) दुपारी निघालेल्या भव्य शोभायात्रेत हजारो समाजबांधव सहभागी होते. विशेषतः या यात्रेतील सजीव देखावे, हलगी पथक व पारंपारिक लोककलेतील कलावंतांनी एका सरस एक सुंदर अशा कला सादर करीत परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून दुपारी 3.30 वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेव्हा राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. व शोभायात्रा स्टेशन रोड मार्गे नारायण चाळ, अष्टभूजा चौक, गांधीपार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुढे मार्गस्थ झाली. या शोभायात्रेत भगवे फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांसह समाजबांधव शिस्तबध्द पध्दतीने सहभागी होते. या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सजीव देखावे लक्षवेधी ठरले. विशेषतः चिमुकल्यांनी राजमाता ज...

अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी भूषविणार पाचवे एकता मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

Image
26 व 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी हे भूषविणार आहेत. 26 व 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुन्हा एकदा अंबानगरीचा नांवलौकिक व अंबाजोगाईतील साहित्य रसिकांचा आनंद द्विगुणित होईल अशी महत्त्वपूर्ण घटना साहित्य क्षेत्रात पुढील आठवड्यात घडून येणार आहे. ते म्हणजे अंबाजोगाईचे प्रख्यात साहित्यिक व कवि दिनकर जोशी हे 26 व 27 डिसेंबर 2022 रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिपक नागरगोजे हे आहेत. या संमेलनात श्रध्देय बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार व स्व.विजयकुमार ठाकूर जी...

परभणीत २३ ते २५ डिसेंबर दरम्यान मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

Image
परभणी (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान परभणी येथील पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशाच्या स्वागताध्यक्षपदी कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी गुरूवार, दि.२४ नोव्हेंबर रोजी आयोजक पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख झरीकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भुसारे, सचिव सुधाकर गायकवाड, कार्याध्यक्ष नरहरी वाघ, प्रवक्ते सुभाष ढगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, शहराध्यक्ष गजानन जोगदंड, सुभाष जाधव, प्रसिध्दीप्रमुख भुसारे यांची उपस्थिती होती. यावेळी भुसारे म्हणाले की, शुक्रवार, दि.२३ डिसेंबर रोजी महाअधिवेशनाला सुरूवात होईल. वसमत रोडवरील जिजाऊ मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर सकाळी १० वाजता महापुरूषांना अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता ग्रंथ अभ्यासक व साहित्यीक बाबा भा...

५० खोके, एकदम ओके..! नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक झाले आक्रमक

Image
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा आवाज घुमला ======================== नागपूर (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक जोरदार आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी पुन्हा "एकदा पन्नास खोके, एकदम ओके" म्हणत शिंदे सरकारचा निषेध केला. कर्नाटकच्या बेळगाव मधील धरपकडीचे ही नागपूर मध्ये तीव्र पडसाद उमटले होते. विरोधकांनी बोम्मई सरकारच्या विरोधात ही जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे सरकारला चोहोबाजूनी घेरले. कर्नाटक सीमा प्रश्न, प्रकल्पांची पळवापळवी, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले. त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरच कर्नाटक सरकार हाय हाय. बोम्मई सरकार हाय हाय....शिंदे सरकार हाय हाय...गद्दारांचे पाप, महाराष्ट्राला ताप खोके सरकार, खोटे सरकार पन्नास खोके, एकदम ओके म्हणत जोरदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर प्रचंड अशी घोषणाबाजी केली. नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्ष नेते अजितदादा प...

परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज स्वीकृती व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन

Image
11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना होणार फायदा ======================== परळी वैजनाथ  (विशेष प्रतिनिधी व्यंकटेश जोशी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) जिल्हा जात पडताळणी समिती बीडच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत "सामाजिक न्याय पर्व" साजरा करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत परळी वैजेनाथ तालुक्यातील वैद्यनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात सोमवार, दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात वैधता पडताळणीचे अर्ज स्विकारण्याचे व प्रमाणपत्र वाटप करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.  सदर कार्यक्रमात 121 विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम हे होते. तसेच उपप्राचार्य हरीश मुंडे, रोडे सर, जात पडताळणीचे कार्यालयाचे कर्मचारी एस.आर.काळे बार्टीचे समतादूत व्यंकटेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. जात प...

'क' वर्ग वृत्तपत्रांना समान न्याय देण्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आश्वासन

Image
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना भेटले 'क' वर्ग वृत्तपत्र संपादक संघाचे शिष्टमंडळ ========================= मुंबई ( विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  राज्यातील 'क' वर्ग वृत्तपत्रांना कोणताही दूजाभाव न करता समान न्याय पद्धतीने जाहिरात वितरण करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 'क' वर्ग वृत्तपत्र संपादक संघाच्या शिष्टमंडळाला देत, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक यांना तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच इतर प्रलंबित मागण्याही मार्गी लावू असे मुख्यमंत्री यांनी याप्रसंगी सांगितले. राज्यातील 'क' वर्ग वृत्तपत्रांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना 'क' वर्ग वृत्तपत्र संपादक संघाचे शिष्टमंडळ शनिवार, दि.१७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'क' वर्ग वृत्तपत्रांन...

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वाधिक लांबीचा राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या विश्वविक्रमवीरांचा अंबाजोगाईत सन्मान

Image
"आई सेंटर" व "द आयडीयल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स" यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष समारंभाचे आयोजन ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) येथील आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संचलित आई सेंटरच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वाधिक लांबीचा राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या रेकॉर्ड्स होल्डर्सचा "आई सेंटर" व "द आयडीयल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष समारंभात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार प्राप्त तथा ऍमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे हे होते. तर विचारमंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंकुश चव्हाण (वर्ग १ - गटविकास अधिकारी, पंचायत. समिती,गंगाखेड,जि. परभणी), सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे (कृषी महाविद्यालय, लातूर) आणि ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.राहुल धाकडे (अंबाजोगाई) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वविक्रमवीर सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक आई सेंटरचे प्रमु...

शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Image
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाईची मदत जाहीर ======================== मुंबई (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना पंचनामे करून मदतीचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, अद्याप पूर्ण मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नव्हती. विरोधी पक्षांना हाच मुद्दा महत्वाचा ठरत होता. पण, आता विरोधकांची तोंडे बंद करण्याचा आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने आध्यादेश काढत शेतकऱ्यांना दुप्पट मदतीची घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईत प्रती हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रूपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये प्रती हेक्टर मिळणार आहेत, तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रूपये प्रती हेक्टरला मिळणार आहेत. तसेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता 36 हजार रूपये मिळणार आहेत. सरकारने नुकसानीची मर्य...

लक्ष्मणराव गोरे यांचा ज्येष्ठ नागरिक संघाचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सन्मान..!

Image
लक्ष्मणराव गोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) येथील श्री मुकुंदराज देवस्थान येथील सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 42 व्या फेस्कॉम वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे बीड जिल्हा समन्वय सचिव लक्ष्मण अंबादास गोरे यांचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या अधिवेशनात बीड, लातूर, उस्मानाबाद व परभणी या जिल्ह्यातील 500 हून अधिक ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरूष उपस्थित होते. सोमवार, दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभाग अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ.बी.आर.पाटील तर उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री ऍड.पंडितराव दौंड, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा (पुणे), फेस्कॉमचे उपाध्यक्ष डॉ.दामोदर थोरात, अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, कार्याध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनात लक्ष्म...

समाबाई शिंदे यांच्या विधीतील पारंपारिक गोष्टीला नातवांनी दिला फाटा

Image
वृक्षारोपण करून अस्थी व रक्षाचे विसर्जन ; दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) येथील समाबाई मारोती शिंदे यांच्या विधीतील पारंपारिक गोष्टीला नातवांनी फाटा दिला, जलप्रदूषण टाळण्यासाठी आजीच्या आठवणी सतत मायेची सावली देतील हा विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा खंडित केली. आणि वृक्षारोपण करून नातवांनी अस्थी व रक्षाचे विसर्जन केले.  निधनानंतरच्या पारंपरिक विधी व प्रथेला फाटा देत येथील पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले बाबासाहेब शिंदे, भगतसिंग ज्युनियर कॉलेज मधील प्रा.रवींद्र शिंदे यांच्या मातोश्री समाबाई मारोती शिंदे यांचे वृध्दापकाळाने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या अस्थि व रक्षा नदीत विसर्जित न करता नातवांच्या हातून तिसऱ्या दिवसाच्या विधी दिवशी पिंपळवृक्ष हे झाड लावून त्यात अस्थि व रक्षा विसर्जित करण्यात आली. अस्थि व रक्षा नदीत विसर्जित केल्याने नदीचे जलप्रदूषण होत असल्याने शिंदे कुटुंबाने या पध्दतीने तिसऱ्या दिवसाचा विधी केला. यावेळी पारंपरिक...

महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अंबाजोगाई अभियांत्रिकी महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राचार्यांना डावलून बडतर्फ प्राध्यापकाची केली कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती..?

Image
पञकार परिषदेत संस्थासचिव माधवराव पाटील टाकळीकर व संस्था संचालक प्रदीप दिंडीगावे यांची माहिती ======================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सन १९९३ पासून  कायमस्वरूपी सेवारत असलेल्या प्राचार्यांना डावलून संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभाराचा आपला वारसा पुढे चालू ठेवत विद्यापीठाची दिशाभूल करून एका बडतर्फ प्राध्यापकाची महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती केली आहे. अशी माहिती पञकार परिषदेत संस्थासचिव, संस्था संचालक यांनी अंबाजोगाईत आयोजित पञकार परिषदेतून दिली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या तसेच विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविद्यालय बंद ठेवून आंदोलन ही करण्यात आले हे विशेष. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्यांचे सतत सुरू असलेले कारनामे ऐकून व पाहून शैक्षणिक वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. अंबाजोगाईत सोमवार, दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित पञकार परिषदेत संस्थासचिव माधवराव पाटील टा...

आदर्श संस्काराचे विद्यापीठ : फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख

Image
आदर्श संस्काराचे विद्यापीठ : फाल्गुनबाई श्रीकिश नराव देशमुख ======================== "आई म्हणजे नि:स्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा, आई तुझे नसणे आज पदोपदी जाणवत आहे. तू नेहमीच समाजातील गरजू लोकांना मदत केलीस, त्यांना मदत करताना हे "विश्वची माझे घर" हा एकच संस्कार जोपासलास. सामाजिक कार्य करताना आम्हाला कायमच प्रोत्साहन दिलेस. तुझे विचार आणि करारी व्यक्तिमत्त्व अखेरपर्यंत जमिनीशी जोडलेले होते. या मातीचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून तू माणुसकी जोपासली. तुझ्यासारखे व्यक्तिमत्त्व आमच्या परीवाराचे वैभव होते. हेच खरे..! आमची आई फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी नुकतेच मंगळवार, दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दु:खद निधन झाले. आमच्यासाठी व समाजासाठी "आदर्श संस्काराचे विद्यापीठ : फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख" या होत्या व यापुढे ही राहतील, आमच्या मातोश्री फाल्गुनबाई हे आदर्श व्यक्तिमत्त्व मला नेहमीच का भावले, का आवडायचे, एक मुलगा म्हणून माझ्या भावना शब्दांतून व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न..!" ====================== आमचे वडील...