५० खोके, एकदम ओके..! नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक झाले आक्रमक

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा आवाज घुमला

========================

नागपूर (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)





नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक जोरदार आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी पुन्हा "एकदा पन्नास खोके, एकदम ओके" म्हणत शिंदे सरकारचा निषेध केला.


कर्नाटकच्या बेळगाव मधील धरपकडीचे ही नागपूर मध्ये तीव्र पडसाद उमटले होते. विरोधकांनी बोम्मई सरकारच्या विरोधात ही जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे सरकारला चोहोबाजूनी घेरले. कर्नाटक सीमा प्रश्न, प्रकल्पांची पळवापळवी, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले. त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरच कर्नाटक सरकार हाय हाय. बोम्मई सरकार हाय हाय....शिंदे सरकार हाय हाय...गद्दारांचे पाप, महाराष्ट्राला ताप खोके सरकार, खोटे सरकार पन्नास खोके, एकदम ओके म्हणत जोरदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर प्रचंड अशी घोषणाबाजी केली. नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार आणि विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली. खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय, शेतकऱ्याला मदत नाय म्हणत महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरात मध्ये गुंतवणूक गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी मिंधे सरकारचा निषेध करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली. मात्र, तो अचानक रद्द केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले. ही दडपशाही असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तर देत आपण सीमावाद प्रकरणी पाठिशी असल्याचे सांगितले, या प्रकरणावर राजकारण करू नये, असे आवाहन ही त्यांनी केले.


========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)