मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन : शोभायात्रा व ग्रंथदिंडीने वेधले परभणीकरांचे लक्ष
मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
=======================
परभणी (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.23) दुपारी निघालेल्या भव्य शोभायात्रेत हजारो समाजबांधव सहभागी होते. विशेषतः या यात्रेतील सजीव देखावे, हलगी पथक व पारंपारिक लोककलेतील कलावंतांनी एका सरस एक सुंदर अशा कला सादर करीत परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून दुपारी 3.30 वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेव्हा राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. व शोभायात्रा स्टेशन रोड मार्गे नारायण चाळ, अष्टभूजा चौक, गांधीपार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुढे मार्गस्थ झाली. या शोभायात्रेत भगवे फेटे परिधान केलेल्या शेकडो महिलांसह समाजबांधव शिस्तबध्द पध्दतीने सहभागी होते. या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सजीव देखावे लक्षवेधी ठरले. विशेषतः चिमुकल्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी वेशभूषा साकारली. तर एका कलावंताने काठ्यांची आत्मसंरक्षणाची सुंदर प्रात्यक्षिके ठिकठिकाणी सादर केली. तसेच पारंपारिक लोककला सादर करणार्या गोंधळींनी, कलावंतांनी एका सरस एक कला सादर केल्या. परसावत नगरातील छञपती शाहू महाराज विद्यालयाच्या लेझीम पथकाने सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. हलगी पथक, शिवकालीन शस्त्रे, खेळही लक्षवेधीच ठरले. या शोभायात्रेत माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर असा आश्वारूढ पुतळाही लक्षवेधी ठरला. ग्रंथरथात भारतीय संविधान, तुकाराम गाथा व प्रख्यात विचारवंत डॉ.आ.ह.साळुंके यांचे साहित्य ठेवण्यात आले होते. शिवशाहीर भारत कठाळे हे शिवनेरीहून आलेले खास आपल्या सजवलेल्या मोटार सायकलसह शोभायात्रेत सहभागी होते. महिलांच्या फुगडी - रिंगण कलाही लक्षवेधी ठरल्या. या शोभायात्रेत मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जून तनपूरे, उपाध्यक्ष डॉ.रामकिशन पवार, स्वागताध्यक्ष कांतराव काका देशमुख, जिल्हाध्यक्ष विठ्ठल भूसारे, समन्वय समितीचे नेते सुभाषराव जावळे, प्राचार्य नितीन लोहट, बालाजीराव मोहिते, गजानन जोगदंड, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा कांचन कारेगावकर, सुनिता यादव, साहेबराव शिंदे, सुशिल देशमुख, नवनाथ जाधव, प्राचार्य विठ्ठल घुले, रूस्तुमराव भालेराव, सुभाष ढगे, अशोक रसाळ, सुधाकरराव गायकवाड, सुनिल जाधव आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. सुनिल जाधव, बाळासाहेब यादव, सुधाकर गायकवाड, नरहरी वाघ, नवनाथ जाधव, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, गजानन सोळंके, गोपाळ भूसारे, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, प्रभाकर लिखे, तुळशीराम दळवे, साहेब शिंदे, शाम गाडेकर, पांडूरंग शिंदे, सुनिता यादव, सुनिता चापके, किरण काळे, डॉ.मिनाक्षी पाटील यांनी यशस्वितेकरीता प्रयत्न केले. दरम्यान, या महाअधिवेशनात रात्री 8 वाजता "सूरसंध्या" हा सदाबहार गितांचा सुमधूर मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
=======================
Comments
Post a Comment