वंजारी महासंघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराने अंबाजोगाईचे सुनिल सिरसाट सन्मानित




अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)


नाशिक येथे रविवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे पहिले एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात साहित्य - कला आविष्कारातील राज्यस्तरीय पुरस्काराने अंबाजोगाई येथील   पत्रकार सुनिल सिरसाट यांना सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल पञकार सुनिल सिरसाट यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.



महाविद्यालयीन जीवनात इतर विषयांसह नाट्यशास्त्र विषय घेऊन पदवी घेतलेल्या सुनिल सिरसाट यांनी स्थानिक पातळीवर, विद्यापीठ स्तरावर आणि राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नाटकांत काम केलेले आहे. शिवाय ते मागील २५-२६ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करीत असताना अंबाजोगाई तालुका स्तरावर ते भाजयुमोचे पदाधिकारी ही राहिलेले आहेत. उत्तम संभाषण कौशल्य आणि रोखठोक स्वभावाचे निर्भीड वक्ते म्हणून ही त्यांची सर्वञ ओळख आहे. तर विशेष म्हणजे मागील १९ वर्षांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. निर्भीड मांडणी आणि रोखठोक लेखणीतून त्यांनी समाजातील सर्वस्तरांतील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने परखड असे लिखाण केलेले आहे. एकंदरीत त्यांनी केलेल्या या सर्व बाबींचा विचार करूनच वंजारी महासंघाने आपल्या पहिल्याच साहित्य संमेलनात राज्यातील पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराने सिरसाट यांना सन्मानित केले आहे. हे विशेष होय.


जीवनातील पहिल्या पुरस्काराने जबाबदारी आणखीनच वाढली :

================

आज जीवनातील पहिला राज्यस्तरीय पुरस्कार हा पत्रकारिता क्षेत्रात मिळाला असून यामुळे भविष्यात लिखाणाची आणखीनच जबाबदारी वाढली असून या क्षेत्रानेच मला समाजमनात ऐक वेगळी ओळख निर्माण करून दिली असल्यामुळे या क्षेत्राचे मी अगदी मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातील वंजारी समाजाचे प्रत्येक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. तर या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले तेलंगणा राज्यातून आलेले समाज प्रतिनिधी आणि त्यांनी हिंदी व आपल्या मायबोली भाषेतून कर्मयोगी संतश्रेष्ठ ह.भ.प.संत भगवानबाबा व लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने दिलेल्या घोषणा. या घोषणांनी जरी करता सभागृह दणाणून गेले असले तरी मुंडे साहेबांच्या आठवणीने काही वेळासाठी सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाल्याने एकूण दिवसभराच्या कार्यक्रमात ही भावनिकता चर्चेचा विषय ठरल्याचे आणि मुंडे साहेबांची उणिव प्रकर्षाने जाणवल्याचे चित्र दिसून आले.


======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)