भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वाधिक लांबीचा राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या विश्वविक्रमवीरांचा अंबाजोगाईत सन्मान
"आई सेंटर" व "द आयडीयल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स" यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष समारंभाचे आयोजन
=========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
येथील आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संचलित आई सेंटरच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वाधिक लांबीचा राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या रेकॉर्ड्स होल्डर्सचा "आई सेंटर" व "द आयडीयल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष समारंभात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व पुरस्कार प्राप्त तथा ऍमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे हे होते. तर विचारमंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंकुश चव्हाण (वर्ग १ - गटविकास अधिकारी, पंचायत. समिती,गंगाखेड,जि. परभणी), सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे (कृषी महाविद्यालय, लातूर) आणि ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.राहुल धाकडे (अंबाजोगाई) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वविक्रमवीर सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक आई सेंटरचे प्रमुख तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी करताना सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना केवळ पुस्तकी ज्ञानावरच भर न देता मुला-मुलींना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कला-क्रीडा, छंद जोपासणे यासोबतच अशा धाडसी मोहिमेत राष्ट्रप्रेम जोपासत सहभाग नोंदवून आपला सर्वांगीण विकास करणे महत्त्वाचे आहे. आणि असे कार्यक्रम त्यांना आयुष्यभर प्रेरणा देणारे असून पुढे जाण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. याप्रसंगी डॉ.राहुल धाकडे, डॉ.किरण चक्रे, पञकार रणजित डांगे, प्रियंका काळे, शिक्षक अरूण शिंदे या विश्वविक्रमवीरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच कृषी महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी मुलभूत चिंतन मांडले. तर अध्यक्षीय समारोप आई सेंटरचे प्रमुख तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी केला. सुरूवातीला मान्यवरांकडून सर नागेश जोंधळे, प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, डॉ.राहुल धाकडे, रणजित डांगे, अस्मिताताई ठोंबरे, संजय शिंगणकर, प्रियंका काळे, श्रेया पवार, सुनिता डांगे, अरूण शिंदे, तेजस्विनी डांगे, ज्ञानेश्वर सुरडकर, शिवेंद्र डांगे, राजेश रेवले, महादेव पुदाले, योगेश्वरी पुदाले, मीर जावेद अली, सावली सरवदे, श्रद्धा शिंदे, रोहन डोंगरे, डॉ.इंद्रजीत भगत, डॉ.किरण चक्रे, डॉ.अनंत मरकाळे या 23 विश्वविक्रमविरांचा यावेळी प्रमाणपत्र, गोल्ड मेडल देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तर प्रारंभी या विश्वविक्रमवीर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन 'आई सेंटरचे आयकॉन' ठरलेले तरूणी कु.श्रद्धा शिवाजीराव शिंदे व कु.योगेश्वरी महादेवराव पुदाले यांनी अस्खलित इंग्रजी बोलताना अतिशय प्रभावीपणे करीत प्रमुख पाहुण्यांची व उपस्थितांची मने जिंकली. सजग पालक व कृतिशील शिक्षक अरूण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक आणि विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आई सेंटरचे मार्गदर्शक परमेश्वर जोंधळे, महादेव पुदाले, तरूण प्रशिक्षक आकाश गजभारे, अंकिता पुदाले, अभय वाघमारे व सर्व 'आई सेंटर'चे फॅमिली मेंबर्स यांनी परिश्रम घेतले.
=========================
Comments
Post a Comment