परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज स्वीकृती व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन
11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना होणार फायदा
========================
परळी वैजनाथ (विशेष प्रतिनिधी व्यंकटेश जोशी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
जिल्हा जात पडताळणी समिती बीडच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत "सामाजिक न्याय पर्व" साजरा करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत परळी वैजेनाथ तालुक्यातील वैद्यनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात सोमवार, दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात वैधता पडताळणीचे अर्ज स्विकारण्याचे व प्रमाणपत्र वाटप करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात 121 विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम हे होते. तसेच उपप्राचार्य हरीश मुंडे, रोडे सर, जात पडताळणीचे कार्यालयाचे कर्मचारी एस.आर.काळे बार्टीचे समतादूत व्यंकटेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. जात पडताळणीचे कार्यालयाचे कर्मचारी एस.आर.काळे बार्टीचे समतादूत व्यंकटेश जोशी यांनी जात पडताळणी प्रस्ताव स्विकारून मार्गदर्शन केले. सदरील आयोजित शिबिरात परळी तालुक्यातील 13 महाविद्यालयातील एकूण 121 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारण्यात आले. या शिबिरासाठी परळी तालुक्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, लिपिक, समान संधी केंद्राचे प्रमुख, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार समतादूत जोशी व्यंकटेश यांनी मानले.
=========================
Comments
Post a Comment