इंडीयन मेडीकल असोसिएशन, अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी डॉ.नवनाथ घुगे तर सचिवपदी डॉ.सचिन पोतदार
इंडीयन मेडीकल असोसिएशन, अंबाजोगाईचे विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी जाहीर केली नुतन कार्यकारिणी
=======================
अंबाजोगाई (संपादक : रणजित डांगे)
इंडियन मेडीकल असोसिएशनची नूतन कार्यकारिणी सर्वानूमते निवड करून जाहीर करण्यात आली असल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मागील सात वर्षांपासून संघटनेचे सलग अध्यक्षपद भुषवून विक्रम प्रस्थापित करणारे डॉ.राजेश इंगोले यांनी आपल्यावर सध्या विविध जिल्हा व राज्य समिती पदांच्या विविध जबाबदाऱ्या असल्याने तसेच नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉकटर्स सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याने तसेच वैद्यकीय, सामाजिक कार्यात व्यस्त असल्याने इंडियन मेडीकल असोसिएशनच्या स्थानिक अध्यक्षपदाला वेळ देऊ शकत नसल्याने त्या पदाला भविष्यात न्याय देता येत नसल्याचे सांगत हे पद यापुढे भूषविण्यास विनम्र नकार दिला होता. त्यामुळे सर्व सदस्यांनी सर्वानूमते नविन अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांची निवड करण्यात यावी असे आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना केले होते. गेल्या सात वर्षांच्या काळात संघटनेसाठी काम करीत असताना संघटनेसाठी तन-मन-धनाने काम केले, या कार्याची पावती म्हणून संघटनेला राज्य पातळीवर स्टेट आय.एम.ए यांचे दोन वेळा बेस्ट ब्रँच, एक वेळा बेस्ट सोशिअल सेक्युरिटी पुरस्कार, आणि वैयक्तिक पातळीवर दोन वेळा बेस्ट प्रेसिडेंट, दोन वेळा डॉ.सुरेश नाडकर्णी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संघटनेला समाजाभिमुख करून संघटनेला इतर सहकाऱ्यांच्या साह्याने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमाद्वारे समाजात नांव प्राप्त करून देऊ शकलो. आय.एम.एच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या सहकार्याच्या बळावरच मी हे यश प्राप्त करू शकलो. यापूर्वीही संघटनेचा सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होतो, यानंतर ही संघटनेचा सक्रिय सभासद म्हणून कार्यरत राहील आणि जिथे कुठे संघटनेला माझी गरज भासेल तिथे मी माझ्या सहकाऱ्यांसाठी उपस्थित असेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. माझ्या कार्यकाळात उपाध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव डॉ.सचिन पोतदार, डॉ.जुबेर शेख, उपाध्यक्ष डॉ.उद्धव शिंदे, कोषाध्यक्ष डॉ.राहुल डाके, डॉ.विवेक सुवर्णकार, डॉ.योगेश मुळे, डॉ.विजय फड, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.दिपक पाटील, डॉ.दिपक कटारे , डॉ.शिवाजी पेस्टे, डॉ.संतोष कुंडगीर, डॉ.निलेश तोष्णीवाल डॉ.प्रदीप दामा, डॉ.प्रल्हाद गुरव, डॉ.चंद्रकांत चव्हाण, डॉ.मधुसूदन बाहेती, डॉ.विजय फड, डॉ.विवेक मुळे, डॉ.अभय इडगर, डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.स्नेहल होळंबे, डॉ. वैशाली पोतदार, डॉ.कांचन आव्हाड, डॉ.प्रज्ञा किनगावकर, यांनी विविध कार्यात, सामाजिक उपक्रमात मला सर्वोतोपरी साह्य केले तसेच डॉ.दिलीप खेडगीकर, डॉ.एस.यु.पाटील, डॉ.नंदकिशोर देशपांडे, डॉ.उत्तम निसाले, डॉ.प्रताप टेकाळे यांनी मार्गदर्शन केले याबद्दल सर्वांचे आभार मानतो असे प्रतिपादन केले. विद्यमान अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, डॉ.नंदकिशोर देशपांडे, डॉ.उत्तम निसाले, डॉ.श्रीनिवास रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.दिलीप खेडगीकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात डॉ.राजेश इंगोले, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.दिलीप खेडगीकर यांनी समायोचित भाषण केले. झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी येथून पुढे दोन वर्षांसाठी कार्यरत राहील. कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे राहतील, अध्यक्ष - डॉ.नवनाथ घुगे, सचिव - डॉ.सचिन पोतदार, सहसचिव - डॉ.निलेश तोष्णीवाल, उपाध्यक्ष - डॉ.अनिल भुतडा, डॉ.नितीन चाटे, कोषाध्यक्ष - डॉ.सुधीर धर्मपात्रे, सह कोषाध्यक्ष - डॉ.विनोद जोशी, सांस्कृतिक सचिव डॉ.योगेश मुळें, डॉ.हनुमंत चाफेकर, क्रीडा सचिव - डॉ.अतुल शिंदे, डॉ.अविनाश मुंडे, महिला प्रतिनिधी - डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.राजश्री धाकडे, डॉ.स्नेहल होळंबे यांचा समावेश आहे अशी माहिती विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
=======================
Comments
Post a Comment