भारज येथे काँग्रेसच्या "हाथ से हाथ जोडो" अभियानास जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद ========================= अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क) आज भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे मोडून पडलेली ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था काँग्रेस पक्षच सुधारू शकतो, सामान्य माणसाला आर्थिक ताकद देण्याचे काम हे काँग्रेस पक्षच करू शकतो, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात काँग्रेस नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील यांचे केलेले निलंबन हे चुकीचे असून, ही मुस्कटदाबी काँग्रेस पक्ष कदापिही सहन करणार नाही, आम्ही काँग्रेस नेत्या खासदार सौ.पाटील यांच्या निलंबनाचा जाहीर निषेध करीत आहोत, हा देश काय आदानीला विकलाय का..? असा सवाल करून अदानी व भाजपाचे पंतप्रधान मोदी यांचे काय नाते आहे, हे केंद्र सरकारने जाहीर करावे. कारण, जो अदानी मागील आठ वर्षापूर्वी देशातील उद्योगपतींच्या यादीत तब्बल 609 व्या क्रमांकावर होता, तो अचानक भाजपच्या सत्तेच्या काळात श्रीमंत उद्योगपतीच्या यादीत दोन क्रमांकावर कसा काय आला याचे उत्तर भाजपा व पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला द्यावे, आदानीकडे अचानक एवढे पैसे कुठून आले..? शासनाच्या तिजोरीवर डल्ला...
Comments
Post a Comment