लक्ष्मणराव गोरे यांचा ज्येष्ठ नागरिक संघाचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सन्मान..!
लक्ष्मणराव गोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
=======================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
येथील श्री मुकुंदराज देवस्थान येथील सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 42 व्या फेस्कॉम वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे बीड जिल्हा समन्वय सचिव लक्ष्मण अंबादास गोरे यांचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या अधिवेशनात बीड, लातूर, उस्मानाबाद व परभणी या जिल्ह्यातील 500 हून अधिक ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरूष उपस्थित होते.
सोमवार, दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभाग अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ.बी.आर.पाटील तर उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री ऍड.पंडितराव दौंड, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा (पुणे), फेस्कॉमचे उपाध्यक्ष डॉ.दामोदर थोरात, अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, कार्याध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनात लक्ष्मण गोरे यांनी उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यकर्ता म्हणून कार्य केले, तसेच इंदुताई पोटपल्लेवार, भावनाथेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ (भावठाणा), आनंतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ (आनंदगाव,ता.केज) आणि ज्येष्ठ नागरिक संघ सांस्कृतिक विभाग, अंबाजोगाई यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे बीड जिल्हा समन्वय सचिव लक्ष्मण अंबादास गोरे यांचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सन्मान झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाईचे अध्यक्ष पुंडलिक पवार, फेस्कॉमचे उपाध्यक्ष डॉ.डी.एच.थोरात, धनराज मोरे, सचिव मनोहर कदम, कार्याध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर, पद्माकर सेलमोकर, कमलताई बरूळे, ज्ञानोबा देशमुख, आशाताई वाघमारे, बालासाहेब आगळे, दत्तात्रय आंबाड, श्रीधर काळेगावकर यांच्यासह सर्व कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या सन्मानानंतर बोलताना लक्ष्मणराव गोरे यांनी हा सन्मान ज्येष्ठ नागरिक संघातील सर्वांचाच आहे अशी भावना व्यक्त करून त्यांना सन्मानित केल्याबद्दल आभार मानले.
========================
Comments
Post a Comment