26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन - डॉ.संतोष मुंडे यांची माहिती
डॉ.संतोष मुंडे यांच्या दिव्यांगांसाठीच्या सक्रिय कार्याचे सर्वस्तरांतून कौतुक
=======================
परळी वैजेनाथ (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
दिव्यांग, विधवा, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर 26 डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी दिला आहे.
डॉ.संतोष मुंडे हे नेहमीच दिव्यांगासाठी सक्रियपणे काम करतात. दिव्यांगासाठी सातत्याने लढा देऊन विविध योजनांचा लाभ त्यांनी दिव्यांगांना मिळवून दिला आहे. सामाजिक भावनेतून प्रामाणिकपणे विविध लोक उपयोगी व उपेक्षित घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचे उपक्रम, आंदोलन ते नेहमीच करतात. फाटलेले, खराब झालेले, जुने, रेशनकार्ड नूतनीकरण असो की, दिव्यांगांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करणे असो या सर्वस्तरावर ते सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहेत. आंदोलनातील मागण्या वरील सर्वांना अंत्यादोय मध्ये (2 रू. प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ) समावेश करून घ्यावा. तहसीलद्वारे देण्यात येणाऱ्या पगारी नियमित करणे व कमी जास्त न करणे., सरसकट घरकुल देण्यात यावे, नगरपरिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा 5% निधी नियमित वाटप करावा, दिव्यांगांना यु.पी.आय.डी कार्ड घरपोहच देण्यात यावे, रेशनकार्ड ऑनलाइन करून देणे व फाटलेल्या रेशनकार्ड बदलून देणे. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सूचना दिव्यांग विधवा परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिक यांनी सोबत आपापली कागदपत्रे आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक 26 डिसेंबर रोजी दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, जेष्ठ नागरिक या सर्वांच्या विविध मागण्यांसाठी आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ.मुंडे यांनी सांगितले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.
========================
Comments
Post a Comment