ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ व ज्येष्ठ संपादक अशोकराव गुंजाळ यांचा "पञकारीता जीवनगौरव" पुरस्काराने सन्मान होणार




कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार डाॅ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार अभिजीत नखाते यांना जाहीर


अंबाजोगाई पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे ६ जानेवारी रोजी वितरण

======================

अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने पञकार संघाचे विश्वस्त प्रा.नानासाहेब गाठाळ आणि अंबाजोगाई पञकार संघाचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ यांना त्यांनी पञकारीता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना "पञकारीता जीवनगौरव पुरस्कार" तसेच अंबाजोगाई पञकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी डाॅ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर (कार्यकारी संपादक,दैनिक पार्श्वभूमी, बीड) तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी अभिजीत नखाते (उपसंपादक, दैनिक लोकाशा, बीड.) यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ संपादकांसह दोन्ही मान्यवर पत्रकारांना दि.६ जानेवारी २०२३ रोजी अंबाजोगाईत दर्पण दिन कार्यक्रमात सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येतील.




या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे असतील, यावेळेस अंबाजोगाई पञकार संघाचे विश्वस्त प्रा.नानासाहेब गाठाळ, अंबाजोगाई पञकार संघाचे विश्वस्त अशोकराव गुंजाळ यांना त्यांनी पञकारीता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना "पञकारीता जीवनगौरव पुरस्कार" तसेच अंबाजोगाई पञकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार डाॅ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर (कार्यकारी संपादक,दैनिक पार्श्वभूमी, बीड) तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी अभिजीत नखाते (उपसंपादक, दैनिक लोकाशा, बीड.) यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ संपादकांसह दोन्ही मान्यवर पत्रकारांना दि.६ जानेवारी २०२३ रोजी अंबाजोगाईत दर्पण दिन कार्यक्रमात सदरील पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येतील. दि.६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता लोकनेते विलासरावजी देशमुख सभागृह, नगरपरिषद कार्यालय, वरचा मजला, अंबाजोगाई (जि.बीड) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दर्पण दिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रविवार, दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी अंबाजोगाई पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक दैनिक विवेकसिंधू कार्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीत "दर्पण दिन - २०२३" आयोजन, पञकारीता जीवनगौरव पुरस्कार आणि स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण या बाबत चर्चा होवून सर्वानुमते ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत गाठाळ हे होते. तर यावेळी अंबाजोगाई पञकार संघाचे मार्गदर्शक अविनाश मुडेगावकर, मार्गदर्शक प्रकाश लखेरा, सचिव रणजित डांगे, सदस्य देविदास जाधव, सदस्य वाजेदभाई शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.


======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)