बारवांचे पुनरूज्जीवन व संवर्धन काळाची गरज - लेखक मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी

आज बारवांना गतवैभव प्राप्त करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे ========================== अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) बारव संवर्धन - महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, समाज सुधारकांची भूमी आहे तशीच ती गड किल्ल्यांची, बारवांची भूमी आहे. ऐतिहासिक वारसा सांगणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. परंतु, आज बारवांना गतवैभव प्राप्त करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. बारव स्थापत्य हे महाराष्ट्रातील एक जाणीवपूर्वक विकसित केलेले शास्त्र आहे. त्या - त्या काळात स्थापत्याने बारव निर्मितीसाठी अतिशय अचूकपणे जलस्त्रोत शोधले होते. प्रामुख्याने सातवाहन काळापासून बारवांची निर्मिती झाली. बारवाचा उपयोग जलसंचय करण्यासाठी केला जात होता. प्रामुख्याने आठव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत बारव निर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु पुढे 14 व्या शतकाच्या पुढे बारवांची निर्मिती थांबली. परंतु, बारव हे चौदाव्या शतकापर्यंत अत्यंत चांगल्या स्थितीत होते. प्रामुख्याने बारव हे मंदिर, तलाव व जंगलात पाण्याच्या संचयासाठी बारवाची निर्मिती केली गेली. 14 ते 18 व्या शतकापर्यंत बारवाची निर...