अंबाजोगाईचा निलेश रांजणकर झाला एमपीएससी मार्फत नगरपरिषद मुख्याधिकारी

निलेश रांजणकर यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन व कौतुक

==========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

येथील निलेश दगडू रांजणकर हा युवक २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून नगरपरिषद मुख्याधिकारी वर्ग दोन पदासाठी पात्र ठरला आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या निलेशचा ओढा हा स्पर्धा परीक्षेकडेच होता. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करताच एका खाजगी कंपनीत नौकरी करत सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देण्यास त्याने सुरुवात केली. प्रथम तो स्टेट बँक ऑफ इंडिया ची परीक्षा पास होऊन बँकेत रूजू झाला. आहे ही नौकरी सांभाळत त्याने पुढील स्पर्धा परीक्षा सुरूच ठेवल्या. एमपीएससी च्या २०२१ या वर्षात झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात तो वर्ग दोन पदाच्या नगर परिषद मुख्याधिकारी पदासाठी पात्र ठरला. आगामी काळातही पुढील स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस त्याने व्यक्त केला. निलेश हा येथील सेवानिवृत्त कृषि सहाय्यक दगडू रांजणकर यांचा मुलगा आहे. निलेश रांजणकर याच्या यशाबद्दल माजी उपनगराध्यक्ष रविंद्र जाधव, गोपाळ धायगुडे, अविनाश तळणीकर, ॲड.राजेंद्र गुप्ता, विनोद तापडे, राजेश गोस्वामी, अतुल जाधव, सुनील जाधव, वैजेनाथ वाघाळकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

==========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)