मातृत्व सांभाळत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधीमंडळ आणि मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवणाऱ्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा
मातृत्व सांभाळत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधीमंडळ आणि मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवणाऱ्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा...
==========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
त्या आल्या, त्यांनी पाहिलं आणि लोकांच्या विश्वासावर विजय संपादन केला. राजकारणाचा कोणता ही पूर्वानुभव नसताना त्या आमदारही झाल्या. आज रखरखत्या ऊन्हात त्यांचा एक पाय मुंबईत आणि दुसरा पाय केज विधानसभा मतदारसंघात असतो. आपलं मातृत्व सांभाळत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबईचे विधीमंडळ सभागृह आणि केज मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवणाऱ्या आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा या प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील एक मुलगी वाटू लागल्या आहेत.
अवघ्या २ महिन्यांच्या तान्हुल्या बाळाला घेऊन आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहून केज विधानसभा मतदारसंघाचे विविध विकासाचे प्रश्न मांडले आहेत, नव्हे तर त्या सर्व प्रश्नांची सोडवणूकही केली आहे. मतदार संघासाठी शेकडो कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आणला आहे. यापूर्वीही आठ महिन्यांच्या गर्भवती असताना देखील त्यांनी विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली होती. आज त्यांची मुलगी ४ महिन्यांची आहे. त्या चिमुकलीची काळजी घेण्यासाठी येथे कोणीच नसल्याने त्यांनी तिला मुंबई येथेच ठेवले आहे. आ. नमिताताई मात्र यावर्षीच्या कडक उन्हाळ्यातही केज विधानसभा मतदारसंघातील विवाह सोहळे आणि विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमास उपस्थिती लावत आहेत. कार्यक्रम, लोकांच्या अडीअडचणी असल्या की मतदार संघात, आणि थोडासा मोकळा वेळा मिळाला कि मुंबईत लेकीकडे धावायचे अशा दुहेरी पालकत्वाची कसरत आ. नमिताताई पार पाडत आहेत. त्यासोबतच, लोकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवत आहेत. त्यामुळे आ. नमिताताई सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आ.मुंदडा पहिल्या दिवसापासून उपस्थित होत्या. सत्ताधारी पक्षाच्या आमदार असताना व नसताना ही आ. मुंदडा यांनी कायम प्रभावी जनसंपर्क ठेवला. मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी मंजूर करून घेतला. जनतेच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा त्यांना आपल्या मुलींसाठी वेळ देता येत नाही. तरी देखील एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आ.मुंदडा या सातत्यपूर्ण कार्य करीत आहेत. ‘मतदारसंघाने निवडून दिल्यामुळे जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणं हे माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया आ.नमिताताई मुंदडा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्या, ऊसतोड महिला कामगारांचं गर्भाशय काढणे, यासारखे अनेक मुद्दे गाजले होते. या सर्व बाबींवर एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आ.मुंदडा यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
*एकाच दिवसांत 40 विवाह सोहळ्यांना हजेरी*
आमदार नमिताताई मुंदडा यांनी सातत्याने मतदार संघातील विविध उपक्रम, कार्यक्रम, उद्घाटन समारंभ यांना उपस्थिती दर्शविली आहे. चालू, मे महिन्यात तर एकाच दिवसांत 40 विवाह सोहळ्यांना हजेरी लावून आमदार नमिताताई मुंदडा यांनी आपला जनसंपर्क किती दांडगा आहे हेच दाखवून दिले आहे. गरीब, श्रीमंत, जात-पात, धर्म असा भेदभाव न करता आ. मुंदडा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. अत्यंत साधे राहणीमान आणि बडेजाव न करता विविध कार्यक्रमांना असणारी त्यांची उपस्थिती लोकांना भारावून टाकते. आ. मुंदडा यांच्या सोबतच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांनीही मागील काही महिन्यांपासून विविध उपक्रम, कार्यक्रम, उद्घाटने, विवाह सोहळे, आनंदाचे असो की, दु:खाचे या सर्व प्रसंगी धावून जात बांधिलकी जोपासली आहे. यामुळेच मागील 40 - 45 वर्षांपासून मुंदडा परिवाराने केज मतदारसंघाच्या समाजकार्यातून जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त केला आहे.
Comments
Post a Comment