बीड जिल्ह्यातील युवकांनी सैन्यात अधिकारी म्हणून भरती व्हावे - मेजर एस.पी.कुलकर्णी यांचे तरूणाईला आवाहन
==========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांच जिल्हा म्हणून ओळख आहे. परंतु, ही ओळख पुसण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची मुले - मुली संरक्षण दलात भरती होऊन आज देश सेवा करीत आहेत. हातात कोयत्या ऐवजी पेन घेऊन परिश्रम जिद्द व चिकाटी त्याचबरोबर योगेश्वरी शिक्षण संस्थेत योग्य मार्गदर्शक मिळत असल्यामुळे आज बीड जिल्ह्यातील हजारो मुले - मुली संरक्षण दलात भरती होत आहे. परंतु, आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातून अधिकारी होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बोटावर मोजण्या एवढेच अधिकारी सैन्य दलात देश सेवा करत आहेत. हे प्रमाण वाढले पाहिजेत त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज सन्मान व समाजात प्रतिष्ठा, पगार भत्ते व सर्व सोयी सुविधा अधिकारी वर्गाला मोठ्या प्रमाणात आहेत. अधिकारी होण्यासाठी बारावी नंतर किंवा बारावी मध्ये असताना विद्यार्थ्यांना एनडीए मध्ये भरती होता येते. या ठिकाणी त्यात तीन ते चार वर्षे प्रशिक्षण देण्यात येते व त्यानंतर भारताच्या सैन्य दलात अधिकारी म्हणून भरती होता येते. किंवा पदवीनंतर सीडीएस (कम्बाईन डिफेन्स सर्विस) मार्फत भरती होता येते व अधिकारी होता येते. तेव्हा सैन्यात अधिकारी म्हणून भरती होणे हा गौरव आहे. त्यासाठी तरूणांनी उच्च विचार व धैर्य ठरवावे, पालक वर्गाला माझी नम्र विनंती आहे की, आपण मुलांना त्यांच्या आवडीची क्षेत्र निवडून द्यावे. सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करावे. मेडिकल, इंजिनिअरिंग यापेक्षा वेगळी क्षेत्र निवडून लहानपणापासूनच त्यांना या ध्येयाकडे वळवावे. सैन्यात भरती होणे हा आपला गौरव आहे अशा पद्धतीचे मुलांवर मनावर बिंबवणे आवश्यक आहे. जेवढी मेहनत आपण मेडिकल, इंजीनियरिंग करण्यासाठी घेतो एवढी मेहनत आपण सैन्यात अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे. आपल्या मुलाने वेगळी वाट निवडावी यासाठी यास प्रोत्साहन द्यावे. ज्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच सैन्य दलात अधिकारी म्हणून भरती व्हावे अशा विद्यार्थ्यांनी एनसीसी राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय संरक्षण दलाचे प्रवेशद्वार आहे ज्या मुलांकडे एनसीसीची सी - सर्टिफिकेट परीक्षा पास आहे अशा विद्यार्थ्यांना सैन्य दलात काही ठिकाणी रिझर्व जागा असतात त्याचा फायदा घ्यावा. एनडीएसाठी याच शाखेतील बारावी पास असावा असा उगाच गैरसमज आहे. सायन्स शाखेतील मुलांना संधी तेवढे नसून आर्ट कॉमर्स सायन्स च्या विद्यार्थ्यांना एनडीए मध्ये भरती होता येते.
योगेश्वरी डिफेन्स करिअर सेंटर :
मागील 32 वर्षांपासून या सेंटरची स्थापना झाली. या सेंटरच्या मार्फत मेजर एस.पी.कुलकर्णी हे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्य दलात भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतात. आतापर्यंत जवळपास दीड हजार तरूण सैन्यात भरती झालेली आहेत. त्याचबरोबर फॉरेस्ट, पोलीस, सीआरपी, एसआरपी यामध्ये मुलीही मोठ्या प्रमाणात भरती झाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ठरवून सैन्य दलात अधिकारी म्हणून भरती व्हायची असेल अशा विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.
==========================
Comments
Post a Comment