कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे उंदरी येथे वितरण




समर्पित व्यक्तीमत्वांचा सन्मान करून कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणने बांधिलकी जोपासली 

- आमदार सतीश भाऊ चव्हाण


तर...पुढील 50 वर्षांत भारतीय शेतीचे वाळवंट होईल - माजी कुलगुरू डॉ.किशनराव गोरे यांनी व्यक्त केली भीती

=========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, दिनांक 19 मे रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे करण्यात आले. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आणि पूर्वसंध्येला निमंत्रितांचे कृषी कवी संमेलन ही आयोजित करण्यात आले होते.



कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने दिवंगत विद्यार्थीप्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, दिनांक 19 मे रोजी सकाळी वृक्ष पुजन व संवर्धन करण्यात येवून नियोजित कार्यक्रमास सुरूवात झाली. उंदरी (ता.केज) येथील कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती भवन येथे आठव्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा देखिल आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सतीश भाऊ चव्हाण (सदस्य, विधान परिषद तथा कार्यकारी परिषद, वनामकृवि, परभणी) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.किशनराव गोरे (माजी कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, माजी आमदार पृथ्विराज साठे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य राहुल सोनवणे (पाटील), युवा नेते शशीभैय्या आडसकर, माजी कुलसचिव डॉ.डी.ए.चव्हाण या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमापूजन केले. त्यानंतर स्मृती प्रतिष्ठाणकडून मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच माजी कुलगुरू डॉ.किशनराव गोरे यांनी श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे व जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानच्या कार्याचा विस्तृत आढावा घेऊन या कार्यक्रमातून तरूण पिढीला दिशा व प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे असे प्रा.बाळासाहेब सुर्यवंशी यांनी नमूद केले. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी सांगितले की, पुढील काळात प्रतिष्ठाण कडून आदर्श पती - पत्नी पुरस्कार दिला जावा. पुरस्कारांची प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे, आपेगावकर कुटुंबियांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे, देविदासजी कुटवाड गुरूजीं सारखी आई - वडिलांची सेवा करावी, डॉ.अमित लोमटे यांच्यासारख्या सेवाभावी डॉक्टर, नर्स, वाॅर्डबाॅय आणि आरोग्य खात्यामुळे कोरोना काळात माणुसकी जीवंत राहिली. राम कुलकर्णी व संपूर्ण परिवाराने एकत्र कुटुंबपद्धतीचा आदर्श टिकवून ठेवला आहे, शिवराम घोडके यांचे सेंद्रिय शेतीतील कार्य व प्रयोग शेतकरी बांधवांना प्रेरणा व बळ देणारे आहेत. ज्येष्ठ संपादक अशोकराव चिंचोले यांनी 41 वर्षे अव्याहतपणे पत्रकारिता क्षेत्रात निस्वार्थपणे व समर्पित भावनेतून कार्य केले आहे. एक उद्योजक व निष्णात बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रदीप ठोंबरे यांनी गुणवत्तेचा ठसा सर्वदूर उमटविला आहे. तर सौ.मोहिनी सुधाकर देशमुख यांनी बचतगट आणि वृक्ष संवर्धन चळवळ अधिक बळकट केली आहे. या सर्व समर्पित व्यक्तीमत्वांना सन्मानित करून स्मृती प्रतिष्ठाणकडून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे गौरवोद्गार आ.चव्हाण यांनी काढले. सेंद्रिय शेतीसाठी अद्यावत माहिती देणारी प्रयोगशाळा, यंत्रणा, आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे अशी अपेक्षा देखील आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना माजी कुलगुरू डॉ.किशनराव गोरे यांनी सांगितले की, हे प्रतिष्ठान चांगले उपक्रम राबवून कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे यांचे समर्पित कार्य व संस्काररूपी विचार पुढे नेत आहे. विविध शासकीय योजना व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा. सततच्या हवामान बदलामुळे शेतीवर होणारे विपरीत परिणाम समजून घ्या, अवकाळी पाऊस, गारपीठ, अवर्षण अशी खूप आव्हाने आहेत. यांचा सामना करावा लागेल. हवामान बदल लक्षात घेऊन शेतीसाठी नवे संशोधन करावे लागेल. नवे तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे. आता स्वतःच शेतकऱ्यांनी उत्पादक, उद्योजक आणि व्यापारी व्हावे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी, मातीचा पोत सांभाळणे, सुधारणे व संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्न व्हावेत. केवळ निसर्गाला दोष देत बसण्यापेक्षा पुढील काळात निसर्गासोबत जगायला शिका. पावसाचे पाणी जमिनीत मुरवा, मृदा व जलसंधारणाचे हे काम आपण वेळीच केले नाही तर पुढील 50 वर्षांत भारतीय शेतीचे वाळवंट होईल अशी भीती माजी कुलगुरू डॉ.किशनराव गोरे यांनी व्यक्त केली. यावेळी अक्षय मुंदडा, माजी आमदार पृथ्विराज साठे, राहुल सोनवणे पाटील यांनी आपले समायोचित मनोगत व्यक्त केले. तर सर्वच पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी समर्पक शब्दांत सत्काराला उत्तर दिले. या शेतकरी मेळाव्यास आमदार सौ.नमिताताई मुंदडा, डॉ.इंद्र मणी (कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी), ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, अंकुशराव शिंदे - भापोसे (पोलिस आयुक्त, नाशिक), दिलीपराव स्वामी - भाप्रसे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर), डॉ.दिनकर जाधव (विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभाग) यांनी शुभेच्छा संदेश पाठवून पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. तसेच अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रमेशराव आडसकर यांनी भेट देऊन आयोजित कार्यक्रमाची माहिती घेतली. सुरूवातीला विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहा मान्यवरांना “कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे (पाटील) स्मृती पुरस्कार" प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांत जागतिक पखावज वादक पंडित उध्दव शंकरबापू आपेगावकर, अबाजोगाई (कला, संस्कृती व सामाजिक पुरस्कार), आदर्श शिक्षक देविदासराव तुळशीराम कुटवाड, रेणापूर (भक्त पुंडलिक पुरस्कार), ज्येष्ठ पत्रकार राम प्रभाकरराव कुलकर्णी, धारूर (आदर्श बंधू भरत पुरस्कार), ज्येष्ठ संपादक अशोकराव चिंचोले, लातूर (पत्रकारिता व सद्भावना पुरस्कार), डॉ.अमित अगतराव लोमटे, अंबाजोगाई (वैद्यकीय सेवा व कोरोना योध्दा पुरस्कार), सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व युवा उद्योजक प्रदीप मधुकरराव ठोंबरे, केज (उंदरी ग्रामभूषण पुरस्कार) तसेच स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे - पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवराम जयराम घोडके (बीड) यांना (कुशल कारभारी किसान पुरस्कार) व स्व.सौ.राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे - पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ.मोहिनी सुधाकरराव देशमुख (अंबाजोगाई) यांना (कुशल कारभारीन किसान पुरस्कार) यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार, फेटा, श्रीफळ असे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिगंबर मोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सर नागेश जोंधळे यांनी करून दिला. तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले. शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. तत्पूर्वी पूर्वसंध्येला गुरूवार, दिनांक 18 मे रोजी सायंकाळी “काव्यसंध्या" हे निमंत्रितांचे कृषी कवी संमेलन उंदरी (ता.केज) येथे आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाकुरे (सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, कोल्हापूर) तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नरेंद्र काळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दंत परिषद), शरद झाडके (उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कवि संमेलनाचे समन्वयक कवी जनार्धन सोनवणे (केज), तर निमंत्रक कवयित्री सौ.अनुराधा सुर्यवंशी - ठोंबरे (लातूर) हे होते. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन कवी राजेश रेवले (सोनपेठ) यांनी केले. कृषी कवी संमेलनात सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई), राजेंद्र रापतवार (अंबाजोगाई), गोरख शेंद्रे (अंबाजोगाई), हानुमंत सौदागर (केज), रंगनाथ काकडे (बनसारोळा), पांडुरंग वागतकर (परभणी) हे मान्यवर कवी सहभागी झाले होते. 18 व 19 मे या दोन्ही दिवशी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांसाठी माजी प्राचार्य डॉ.बाळासाहेब चव्हाण, वसंतराव मोरे, मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीदादा ठोंबरे, भाई मोहन गुंड, प्रा.हनुमंत भोसले सर, संपादक रणजित डांगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पुंडलिक पवार, मनोहर कदम, ऍड.अनंतराव जगतकर, डॉ.दामोदर थोरात, पत्रकार नागेश औताडे, पत्रकार संभाजी मस्के, गणेश देशमुख, अनंत भोसले, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा प्रकाशक प्रकाश अंधारे सर, बच्चेसाहेब देशमुख, धनराज मोरे, ई.ना.जाधव, बालाजी शेरेकर, खंदारे सर, राजकुमार जाधव यांच्यासह केज, अंबाजोगाई, धारूर तालुका व बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे (पाटील) आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनंतराव ठोंबरे, प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सुदामराव ठोंबरे, बाळासाहेब सुर्यवंशी, उत्तरेश्वर सोनवणे, भरतराव ठोंबरे, लालासाहेब ठोंबरे, सौ.अनुराधा ठोंबरे - सुर्यवंशी यांचेसह उंदरी (ता.केज) येथील समस्त गावकरी, माजी कृषी विद्यार्थी संघ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथील मित्र परिवार, नातेवाईक आणि ठोंबरे कुटुंबियांनी पुढाकार घेतला होता.


=========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)