भाजपच्या कार्यकाळात तळागाळातील जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून फायदा - आ.नमिताताई मुंदडा

बीड येथे भाजप जिल्हा कार्यसमितीच्या बैठकीचे आयोजन

======================

बीड / संपादक रणजित डांगे

(लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) 

देशाला खऱ्या अर्थाने सक्षम आणि विकासाभिमुख बनवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची काम करण्याची पद्धत जगाला प्रभावित करत आहे. गेल्या ९ वर्षात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात देशातील तळागाळातील ग्रामीण जनतेला अनेक योजनांच्या माध्यमातुन बळ आणि फायदा देण्याचे कार्य केले गेले असून, जागतिक पातळीवर देशाला नवी उंची आणि नावलौकिक प्राप्त करून देण्यात यश आले आहे असे प्रतिपादन केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी भाजपच्या जिल्हा कार्यसमिती बैठकीत केले. 


उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार तिरतसिंह रावत, मध्यप्रदेश पर्यटना विभागाचे अध्यक्ष विनोदजी गोटिया, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे, बीडच्या खा.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२४) बीड येथे भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा लोकसभा आढावा बैठक तसेच जिल्हा कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ आढावा आणि केंद्रात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असल्याने ३० मे ते ३० जून या कालावधीत होत असलेल्या महाजनसंपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आदिनाथराव नवले पाटील, सर्व जिल्हा कार्यकारणी, प्रदेश कार्यकारिणी, कोअर कमिटी, मोर्चा, प्रकोष्ठ, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस,तालुका कार्यकारणी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)