विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचे भारतीय शिक्षण तज्ज्ञांपुढे आव्हान : विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे
द बुद्धिस्ट इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल - साखला प्लॉट, लोहगांव रोड, श्रावस्ती नगर, शाखा परभणी येथील नविन बांधकाम करण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे भव्य उद्घाटन
-------------------------------------------
परभणी / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
आजच्या 21 व्या शतकातील म्हणजेच विज्ञान युगातील सर्वात मोठा बदल म्हणून जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे संपूर्ण जगात वास्तववादी व अत्याधुनिक तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित करण्यासाठीचे नवनविन प्रयोग तथा संशोधन होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठीचे मोठे आव्हान भारतीय शिक्षण तज्ज्ञांपुढे उभे ठाकल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्गदर्शक तथा ॲमेझॉन बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखक व विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे (संस्थापक,आई सेंटर) यांनी केले.
"द बुद्धिस्ट इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल - साखला प्लॉट, लोहगांव रोड, श्रावस्ती नगर, शाखा परभणी" येथील नविन बांधकाम करण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे भव्य उद्घाटन प्रसंगी सर नागेश जोंधळे हे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर "द डायनॅमिक कम्युनिकेटर" म्हणून सुप्रसिद्ध असलेले 'इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर' अर्थात 'आई सेंटर'चे संस्थापक तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके, डॉ.धर्मराज चव्हाण डॉ.सिद्धार्थ वसेकर, इंजि.गोपीनाथ कांबळे तसेच विशेष अतिथी म्हणून एसएससी बोर्डाचे शिकिंद्र वाकळे (औरंगाबाद), महेंद्र सनके, नितीन सावंत, विजय सावंत, सुबोध कांबळे, तलाठी त्रिशोक वाकळे, सजग पालक सुभाष नेतने, प्रा.डॉ.महादेव सरवदे (अध्यक्ष,माता रमाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, परभणी) व द बुद्धिस्ट इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या प्रमिला खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्या प्रमिला खिल्लारे यांनी सांगितले की, "द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल" मध्ये सीबीएसई या केंद्रीय अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणासोबतच आपल्या देशाच्या उभारणीत प्रमुख कामगिरी करणाऱ्या सर्व थोर नेत्यांचे तसेच आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रात संपूर्ण जगभर होणारे संशोधन व मुलांमध्ये चिकित्सक बुद्धीला चालना मिळण्यासाठी विविध विषयाचे तज्ज्ञ त्याचबरोबर सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांचे दर महिन्याला सेमिनार व वर्कशॉपच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर मुलां - मुलींसाठी, पालकांसाठी तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गासाठी दर्जेदार व सर्वांगिण विकासासाठीचे कार्यक्रम राबविण्याची तसेच सर्व जाती - जमाती व धर्मांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन एक चांगला व आदर्श नागरिक घडविण्यासाठी आपल्या पाल्याचे प्रवेश आमच्या संस्थेत निश्चित करून आम्हाला सेवेची संधी देण्यासाठीचे आवाहन करीत आम्ही तुमच्या पाल्यांना उत्कृष्ट निकाल देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्राचार्या खिल्लारे यांनी सांगितले. तर यावेळी माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रकाश डाके म्हणाले की, शिक्षण हे केवळ एका जातीपुरते किंवा धनदांडग्यांसाठी मर्यादित नसून ते सर्व जाती धर्मातील गरीब, मध्यम व श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी यांच्यासाठी देखील उपलब्ध आहे. तरी सुजाण पालकांनी परभणी मध्ये सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे नुसतेच कौतुक न करता सर्वांनी मिळून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून आपल्या परीने सहभाग नोंदवावे, तसेच संस्था वाढीसाठी आर्थिक योगदानासहित वेळ देण्याचे ही आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्घाटक तसेच शिक्षणतज्ज्ञ सर नागेश जोंधळे यांनी लगेच अकरा हजार रूपयांची देणगी संस्थेस देवून संस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी "विद्यार्थी - पालक - शिक्षक" या त्रिसूचीवर आधारित अत्याधुनिक प्रणालीचे तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण 'आई सेंटर'च्या माध्यमातून देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.महादेव सरवदे यांनी मानले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षिका, कर्मचारीवर्ग यांच्यासहीत इंजि.नेहा नेतने, रत्नदीप वाकळे, अमरदीप वाकळे आदींनी पुढाकार घेतला.
================================
Comments
Post a Comment