खरीप हंगाम बैठकीत आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी मांडले कृषी विषयक महत्वाचे प्रश्न


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्या ; बी-बियाणे, खते वेळेवर उपलब्ध करून द्या - आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांची मागणी 

================================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळपिके, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, घरांची पडझड, तुतीचे शेड व शेतातील गोठ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी या मागणीसह कृषी संदर्भात अनेक महत्वाचे प्रश्न केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी खरीप हंगाम नियोजन बैठकीत मांडले.

बीड जिल्ह्यातील लहरीप हंगाम नियोजना संदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ.नमिताताई मुंदडा यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात अनेक महत्वाचे प्रश्न बैठकीत मांडले. खरीप हंगाम २०२२ मध्ये सातत्याने पडलेल्या पावसाचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे. पर्जन्यमापक यंत्रे प्रत्येक तलाठी सज्जावर बसवणे अत्यंत आवश्यक आहे. महाडीबीटी योजनेतील शेतकऱ्यांना ठिबक व तुषारचे पैसे मागील सहा महिन्यापासून मिळाले नाहीत. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. शेतकऱ्यांना खरीप हंगामात सोयाबीन बियाणे, कापूस बियाणे व इतर बियाणे आणि खते वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावीत अशा मागण्या आ.मुंदडा यांनी केल्या. तसेच, एच.व्ही.डी.एस योजनेअंतर्गत बसवलेले ट्रान्सफॉर्मर फेल झालेले आहेत. ते तीन ते सहा महिन्यापासून उपलब्ध नाहीत. सन २०२२ - २३ अंतर्गत शेतीपंपाची नवीन जोडणी एच.व्ही.डी.एस अंतर्गत घेण्यात यावी. ६०० मीटर अंतरावरील शेती पंप जोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत. सदरील शेतकऱ्यांना एचव्हीडीएस अंतर्गत जोडणी देण्यात यावी. लाईन रेडी पासून चार पोलवर शेती पंप जोडणी असेल तर नवीन पोल उभे करून केबल टाकून जोडणी दिली जात आहे. सदरील ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत. अशा शेतकऱ्यांना व अशा ट्रान्सफॉर्मर वरील जोडण्या स्वतंत्र एच.व्ही.डी.एस अंतर्गत ट्रांसफार्मर देण्यात याव्यात असेही आमदार मुंदडा बैठकीत म्हणाल्या. दरम्यान, या सर्व महत्वाच्या प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.

===============================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)