मुलांची मोबाईलची सवय सोडविण्यासाठी राजस्थानी युवती संघटनेचे उन्हाळी शिबिर ठरतेय लाख मोलाचे


पहिल्याच वर्षी उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद :

================================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की, आठवतात ते मामाच्या गावाला जाऊन धम्माल मस्ती करण्याचे दिवस. मात्र, आता मुलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही यामध्ये गुंतले आहेत. कोरोना काळात त्यात आणखी भर पडली. या आभासी जगातून मुलांना बाहेर काढण्यासाठी अंबाजोगाईतील राजस्थानी युवती संघटनेच्या वतीने 29 एप्रिल ते 5 मे या कालावधीत दररोज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत श्री बालाजी मंदिर, पांडुरंग लॉन्स जवळ, गुरूवार पेठ, अंबाजोगाई येथे 6 ते 15 वर्षे वयोगटातील मुला व मुलींसाठी धम्माल, मजा, मस्ती करण्यासाठी विशेष उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबिरात मध्ये योगा आणि मेडिटेशन, झुंबा आणि एरोबिक्स, श्लोक आणि भजन, सर्कल टाईम, व्यक्तिमत्व विकास, इनडोअर व आऊटडोअर खेळ, छोटे कलाकार, क्विझ व्हिझ, रेखाचित्रे, रंगभरण, संगीत, नृत्य, खाना खजाना, ब्रेन ऍक्टिव्हिटीज, आरोग्य, मैदानी खेळ, कथाकथन, शारिरीक हालचाली असलेले विविध खेळ अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. ज्यातून मुलांना त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करता येईल व सकारात्मक विचार, ऊर्जा कशी वाढवावी, ज्यातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशा शिबिरातून मुलांना खेळायला आणि शिकायला मिळते. या शिबिरास प्राचार्या आशा चोकडा (उमरगा), जगदीश जाजू, पुनम जाजू, किरण भन्साळी, कांतादेवी मुंदडा यांनी भेट देऊन आयोजक व सहभागी मुलांना प्रोत्साहित केले आहे. या शिबिराच्या यशस्वितेसाठी राजस्थानी युवती संघटना, अंबाजोगाईच्या अध्यक्षा भाग्यश्री शर्मा, सचिव खुशी पल्लोड, कोषाध्यक्ष प्रतिक्षा बजाज, सदस्या रक्षा शर्मा, श्रेया बजाज, समिक्षा बजाज, धनश्री धुत, करूणा मुंदडा, सिध्दी मंत्री, ॠतुजा बंग, श्रध्दा दरगड, साक्षी शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे.

पहिल्याच वर्षी उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद :

================================================

याबाबत अधिक माहिती देताना राजस्थानी युवती संघटनेच्या अध्यक्षा भाग्यश्री शर्मा यांनी सांगितले की, मुलांमध्ये मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे विकार जडत आहेत. मुलं भारतीय संस्कृतीचे संस्कार आणि आपले परंपरागत मैदानी खेळ खेळणे विसरत चालले आहेत. मुलं मैदानी खेळाकडे परत यावेत, मुलांमध्ये भारतीय संस्कृतीचे संस्कार रूजवले जावेत, मुलांमध्ये परस्पर संवाद साधला जावा, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, मुलांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आयोजित या समर कॅम्प - 2023 चे प्रायोजकत्व क्रेडाई अंबाजोगाईचे अध्यक्ष संजयजी सुराणा यांच्या "सुराणा बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स" या संस्थेने घेतले आहे. पहिल्याच वर्षांपासून या उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचे समाधान वाटत आहे. शिबिराची वेळ ही मुलांच्या पालकांशी चर्चा करून ठरविण्यात आलेली आहे. शिबिरात मुलांमध्ये बौद्धिक व शारीरिक वाढ व्हावी, यासाठी पालक वर्ग या शिबिराला पसंती देत आहे. शिबिराचे आयोजक संजयजी सुराणा म्हणाले की, "शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे शिबिर आयोजन करणारा राजस्थानी युवती संघटना हा पहिलाच ग्रुप आहे. या शिबिरातून मुलांना अप्रतिम अनुभव मिळतो. या शिबिरामध्ये सहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ शिकविले जातात. ज्यामध्ये बौद्धिक शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा हा उद्देश आहे. इतकेच नाही तर संगीत, नृत्य, इनडोअर, ड्रॉईंग, टॅटू तयार करणे, ग्रीटिंग कार्ड बनवणे, योगा आणि मेडिटेशन असे बरेच काही खेळ या शिबिरात आहेत. नवे काही शिकण्याचा चांगला अनुभव आम्हाला मिळत असल्याचे सहभागी विद्यार्थी सांगतात असे या शिबिराच्या आयोजकांनी सांगितले आहे.

================================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)