महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्यवाहपदी अनंत जोशी यांची निवड
==========================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची बीड जिल्हा कार्यकारिणी समिती बैठक राजेंद्र खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा कार्यवाह म्हणून कै.देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय, प्राथमिक विभाग (प्रशांतनगर), अंबाजोगाई या शाळेतील उपक्रमशील सहशिक्षक अनंत जोशी यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भगवानराव चाटे कोषाध्यक्ष विष्णु मिसाळ, उपाध्यक्ष तात्यासाहेब जेवे, सदस्य दिनेश घोळवे, डी.एन.बांगर, काकासाहेब चौधरी, महिला विभागप्रमुख रूपालीताई देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविणे हिच प्राथमिकता असेल असे मत सर्वांनी मांडले. यावेळी बोलताना प्रा.किरण पाटील यांनी निवडणूकीतील हार - जीत हा भाग महत्वाचा नसून शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे अनुदान, जुनी पेन्शन योजना आश्वासित प्रगती योजना यांसारखे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना संपूर्ण ताकदिनीशी आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकीले यांनी राज्याचे पदाधिकारी कायमच आपल्यासोबत असतील याची ग्वाही दिली. यावेळी राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकीले, प्रा.किरण पाटील, प्रा.चंद्रकांत मुळे विभागाचे अध्यक्ष नंदकिशोर झरीकर, कार्यवाह सुरेश पठाडे संघटन मंत्री मधुकरराव कुलकर्णी, उमेश जगताप, शरद ढवळे व बीड जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, कार्यवाह उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर व हिंगोली जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन कार्यवाह प्रा.बाळासाहेब साळवे यांनी केले. तर बैठकीस उपस्थित असलेल्यांचे आभार भगवानराव चाटे यांनी मानले. सहशिक्षक अनंत जोशी यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
==========================
Comments
Post a Comment