केज मतदारसंघातील रस्त्यांसाठी आणखी ४७ कोटींचा निधी मंजूर

आ.नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील रस्ते होणार चकाचक* ========================================= अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केज विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यावधीच्या निधीचा ओघ सुरूच आहे. राज्य शासनाने पुन्हा एकदा आ.मुंदडा यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी तब्बल ४७ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नेतृत्व कार्यक्षम असल्यानंतर शासन ही मुक्त हस्ताने मदत करते याची प्रचीती केज मतदार संघातील नागरिकांना येत आहे. आ.नमिताताई मुंदडा यांनी विकास कामांसाठीच्या पाठपुराव्यात सातत्य ठेवल्याने मागील सहा महिन्यापासून मतदारसंघावर निधीचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. येथील विकास कामांसाठी शासनाने शेकडो कोटींचा निधी मंजूर केला असून अनेक कामांना सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान, मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची मागील काही वर्षांत अतिशय दैना झाली होती. ग्रामस्थांना अगणित अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आ.नमिताताई म...