केज मतदारसंघातील रस्त्यांसाठी आणखी ४७ कोटींचा निधी मंजूर
आ.नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील रस्ते होणार चकाचक*
=========================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केज विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यावधीच्या निधीचा ओघ सुरूच आहे. राज्य शासनाने पुन्हा एकदा आ.मुंदडा यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत केज मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी तब्बल ४७ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
नेतृत्व कार्यक्षम असल्यानंतर शासन ही मुक्त हस्ताने मदत करते याची प्रचीती केज मतदार संघातील नागरिकांना येत आहे. आ.नमिताताई मुंदडा यांनी विकास कामांसाठीच्या पाठपुराव्यात सातत्य ठेवल्याने मागील सहा महिन्यापासून मतदारसंघावर निधीचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. येथील विकास कामांसाठी शासनाने शेकडो कोटींचा निधी मंजूर केला असून अनेक कामांना सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान, मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची मागील काही वर्षांत अतिशय दैना झाली होती. ग्रामस्थांना अगणित अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आ.नमिताताई मुंदडा यांनी विविध रस्त्यांसाठी शासनदरबारी सर्व पातळ्यांवर पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर आ.मुंदडा यांच्या मागण्यांची दखल घेत राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केज मतदारसंघातील रस्त्यांसाठी ४७ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून केज तालुक्यातील इजिमा-६९ ते गप्पेवाडी - १.१८ कोटी, इजिमा-६९ ते नामेवाडी - १.०४ कोटी, प्रजिमा-५९ ते केकानवाडी - ८५ लाख, राममा ५४८डी ते भाटुंबा - १.५७ कोटी, राममा-५४८डी ते पिसेगाव आडस - ७.८६ कोटी, रा.म.मा.-५४८डी ते चंदन सावरगाव जवळ ते जवळबन - ४.४३ कोटी, रा.मा.-६४ ते सावळेश्वर जवळ ते आवसगाव ते इजिमा १३३ - ५.०७ कोटी, अंबाजोगाई तालुक्यातील रा.मा.२११ ते कोळकानडी - १.५८ कोटी, इजिमा-८५ ते पवारवस्ती - १.३२ कोटी, भावठाणा ते चिचखंडी - २.३८ कोटी, चिचखंडी ते राक्षसवाडी - ३.९७ कोटी, डोंगरपिंपळा ते राजेवाडी ते राजेवाडी तांडा - २.१८ कोटी, राममा ५४८डी ते उमराई - २.४६ कोटी, रामा २११ ते वरपगाव - ३.२९ कोटी, प्रजिमा-५१ ते सोनवळा - २.४७ कोटी, बीड तालुक्यातील प्रजिमा-७४ ते नेकनूर ते नन्नवरे वस्ती - १.४९ कोटी, प्रजिमा-७४ ते माळेवस्ती (काळेवस्ती) - १.९२ कोटी, रा.म.मा.-५४८डी ते चाकरवाडी - २.२४ कोटी या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर लवकरच या कामांना सुरूवात होणार असून या भागातील ग्रामस्थांची रस्त्यांअभावी होणाऱ्या हाल अपेष्टांमधून सुटका होणार आहे. केज मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन, बीडचे पालकमंत्री अतुलजी सावे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे आ.नमिताताई मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
================
Comments
Post a Comment