केजमधील कै.गोपीनाथरावजी मुंडे साहेब सभागृहासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
आ.नमिताताई मुंदडा यांच्या पाठपुराव्याने केजकरांची जिव्हाळ्याची मागणी पूर्णत्वास
==============================================
केज (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
केज शहरासाठी भव्य सांस्कृतिक सभागृह असावे अशी मागणी शहरातील नागरिकांकसून सातत्याने करण्यात येत होती. अखेर, केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. केज शहरात कै.गोपीनाथरावजी मुंडे साहेब सभागृहास शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केज शहराचा विस्तार वेगाने होत आहे. शहराची लोकसंख्याही ५० हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची जागा असावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा असलेला सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न हाती घेत आ.नमिताताई मुंदडा यांनी केज शहरात लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने भव्यदिव्य सांस्कृतिक सभागृह उभारावे, अशी मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. आ.मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून हा महत्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे. नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतंर्गत केज नगर पंचायत क्षेत्रात कै.गोपीनाथरावजी मुंडे साहेब सभागृहास मंजुरी मिळाली असून यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय २८ मार्च रोजी नगरविकास विभागाने जारी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा शासनाने या सभागृहासाठी उपलब्ध करून दिली आहे. केजकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे आ.नमिताताई मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
==============================================
Comments
Post a Comment