जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

 



आ.धनंजय भाऊ मुंडे मार्गदर्शनाखाली बारा वर्षांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश - प्रदीप खाडे

================================================

परळी वैजेनाथ (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असुन धर्मादाय उप आयुक्त बीड यांनी निवडणुक अधिकारी नेमत जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक घेण्याचे आदेश दिल्यानंतर आ.धनंजय भाऊ मुंडे मार्गदर्शनाखाली अर्जदार प्रदिप खाडे यांनी परळी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आणि पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.


जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक बारा वर्षांपूर्वी झाली होती. 2009 पासून 468 जणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी सभासदांची न्यायालयीन लढाई सुरू होती. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवअप्पा मुंडे, प्रदीप खाडे यांनी बीड येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे न्यायालयीन लढा सुरू करून समोरील गटाचे 2010 निवडूनकीनंतर सर्व चेंज रिपोर्ट न्यायलयाने फेटाळून लावून प्रदीप खाडे यांचा ४१ (अ) चा अर्ज वैध ठरवून जवाहर एज्युकेशन सोसायटीची संचालक मंडळाची निवडणुक घेण्याचे आदेश दिल्याने निवडूनक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार आहे. या न्यायलयीन लढाईचे कामकाज अंबाजोगाई येथील सुप्रसिध्द विधीज्ञ ऍड.सतीश काळम पाटील यांनी पाहिले. तसेच प्रदीप खाडे यांना ज्येष्ठ प्रा.सदाशिवअप्पा मुंडे व प्रा.डॉ.पी.एल.कराड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यावर परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैद्यनाथ महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करीत आंनदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदीप खाडे, सुरेशनाना फड, प्रा.डॉ.पी.एल.कराड, प्रा.हरिष मुंडे, गोविंद मुंडे, प्राचार्य अतुल दुबे, प्रा.शंकर कापसे, प्रा.किरण शिंदे, प्रा.शेख अली, दगडू भाळे, सुरेश नरवटे, प्रा.शेख इरफान जयराज देशमुख, भोयटे आण्णा, विष्णू शिंदे व इतर उपस्थित होते.

   



परळी परिसरात अल्पवधीतच अनेक शाळा महाविद्यालय नाथ शिक्षण संस्थेमध्ये घेऊन परळीतील शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ महाविद्यालय आ.धनंजय भाऊ मुंडे साहेब यांच्या ताब्यात येत आहे. प्रदीप खाडे यांनी सदाशिवअप्पा मुंडे, प्रा.डॉ.कराड यांच्या सहकार्यने न्यायालयीन लढाई बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर व मंत्रालयापर्यंत न्यायालयीन व सर्व कामकाज हा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर निवडूणक जाहीर होऊन आ.धनंजय भाऊ मुंडे यांचा शिक्षण क्षेत्रात परळी पॅटर्न होत आहे. या मागचे किंगमेकर प्रदीप खाडे यांना यश आले आहे. 

 



स्व.पंडितअण्णा मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करता आले - प्रदिप खाडे

===========================================

बारा वर्षांपूर्वी आ.धनंजय भाऊ मुंडे साहेब जवाहर एज्युकेशन सोसायटीवर असावेत अशी इच्छा स्व.पंडितअण्णा मुंडे यांनी बोलून दाखविली होती. त्यानंतर आम्ही 12 वर्षे न्यायालयीन लढाई लढली अखेर गुढी पाढव्याच्या दिवशी आम्हाला यश प्राप्त झाले असून नव्या वर्षात आ.धनंजय भाऊ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जवाहर एज्युकेशन सोसायटी शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय लिहिणार असुन स्व.पंडितअण्णा मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करता आले याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया अर्जदार प्रदिप खाडे यांनी व्यक्त केली.


===========================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)