थायरॉईडची तपासणी अत्यावश्यक ; जास्तीत - जास्त महिलांनी लाभ घ्यावा - आ.नमिताताई मुंदडा यांचे आवाहन


स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरूग्ण विभागात वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीषजी महाजन यांच्या संकल्पनेतून "थायरॉईड मशीन" या अभियानाचे उद्घाटन 

===============================================




अंबाजोगाई / रणजित डांगे
(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

थायरॉईड हा एक सामान्य आजार झाला असून महिलांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळुन येतो या आजाराला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी थायरॉईड ची तपासणी करून घ्यावी व पुढील धोके टाळावेत असे आवाहन आ.सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरूग्ण विभागात आज वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री ना.गिरीषजी महाजन यांच्या संकल्पनेतून " "थायरॉईड मशीन" या अभियानाचे उद्घाटन करताना आ.नमिताताई मुंदडा या बोलत होत्या. 



व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.राकेश जाधव, मेडिसीन विभागप्रमुख तथा थायरॉईड मशीनचे नोडल ऑफिसर डॉ.सिध्देश्वर बिराजदार, अधिसेविका उषा भताने व इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या विस्तारीत भाषणात आ.नमिताताई मुंदडा पुढे म्हणाल्या की, "थायरॉईड" हा आजार सर्वसामान्य आजार झाला असून या आजारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. थायरॉईड या आजारांवर वेळीच उपचार मिळावेत म्हणून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने थायरॉईड मशीन हे अभियान आजपासून सुरू केले असून या अभियानांतर्गत जास्तीत - जास्त रूग्णांनी थायरॉईडची तपासणी करून घ्यावी व पुढील धोके टाळावेत असे आवाहन केले. आपल्या भाषणात आ.नमिताताई मुंदडा यांनी वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे आपल्याला खूप समाधान व आनंद मिळतो असे सांगत ज्या पध्दतीने या वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभाग एकत्र येऊन अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात असे चित्र राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयात पहावयास मिळत नाही असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करून थायरॉईड मशीन अभियान ही या महाविद्यालयात निश्चितच प्रभावी पणे राबविण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागप्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार यांनी राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीशजी महाजन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालकांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात ३० तारखेला थायरॉईड मिशनचे उद्घाटन करण्याच्या सुचना दिल्याप्रमाणे येथे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरूग्ण विभागात आजपासून दर गुरूवारी दुपारी १२:३० ते २:३० या कालावधीत स्वतंत्र थायरॉईड ओपीडी सुरु करण्यात येणार असून या ओपीडी मध्ये फक्त थायरॉईड रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. थायरॉईड असलेल्या रूग्णांना नेमका कोणत्या प्रकारचे थायरॉईड आहे. याचे निदान करून योग्य उपचार करुन थायरॉईड रूग्ण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना या पुर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे मुखशुध्दी अभियान, स्थुल निवारण निवारण अभियान, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी अभियान, वृध्दत्व आजार व उपचार अभियान व इतर अभियान अत्यंत यशस्विपणे राबविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे सांगत रक्त संकलना मध्ये या महाविद्यालयातंर्गत असलेल्या शासकीय रक्तपेढीने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या विविध विभागात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरूग्ण विभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रूग्णालयाचे उपअधिक्षक डॉ.विश्वजित पवार यांनी केले. तर आभार रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.राकेश जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास मेडिसीन विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.संजय चव्हाण, डॉ.मधुकर कांबळे, डॉ.अंजली देशमुख, विभागप्रमुख डॉ.मोगरीकर, डॉ.प्रशांत देशपांडे, डॉ.नितीन चाटे, डॉ.अभिमन्यु तरकसे, डॉ.शंकर धपाटे, डॉ.सुनिता बिराजदार, डॉ.दिपक लामतुरे, डॉ.रमेश लोमटे, डॉ.शिला गायकवाड, डॉ.अमित चव्हाण, विविध विभागातील लेक्चर्स, हाऊस ऑफिसर, मेडीकल ऑफिसर, मेडिसीन, सर्जरी, इएनटी, ऍनास्थेशिया विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी, परिचारीका महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी, वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती.


==================================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)