ॲड.माधव जाधव यांची सामाजिक बांधिलकी ; जवळगाव येथील आई - वडिलांचे छत्र हरवलेल्या चिमुकल्यांना दिला आधार
जवळगाव येथील चिमुकलीच्या नावाने एफडी करून घेतली शिक्षणाची जबाबदारी
=================================================
परळी वैजेनाथ / रणजित डांगे
(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
परळी विधानसभा मतदारसंघातील जवळगाव (ता.अंबाजोगाई) येथील मजुरी करणारे सुभाष ज्ञानोबा डेरनासे यांचे काही वर्षांपूर्वी विहीरीत काम करत असताना क्रेन पडून निधन झाले होते. त्यांची पत्नी मनीषा सुभाष डेरनासे यांचे ५ दिवसांपुर्वी अपघाती निधन झाले. ही माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते ॲड.माधव जाधव यांनी जवळगाव येथील आई - वडिलांचे छत्र हरवलेल्या चिमुकल्यांना तात्काळ आधार दिला, एवढ्यावरच न थांबता ॲड.जाधव यांनी चिमुकलीच्या नावाने एफडी करून शिक्षणाची जबाबदारी घेतली.
मयत सुभाष व मनिषा डेरनासे या दांपत्यास दोन मुली व एक मुलगा आहे. मुलगी वैष्णवी ११ वी, दुसरी मुलगी गीता ७ वी आणि मुलगा प्रथमेश ३ री वर्गात शिकत आहेत. तसेच वयोवृद्ध आई - वडील आहेत. कुटुंबाचा मुख्य आधार हा काळाने हिरावून घेतला. त्यांच्या कुटुंबाला इतर उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नाही. जन्मदाते आई व वडील यांचे निधन झाल्यामुळे लहान चिमुरडे व वयोवृद्ध आई वडील उघड्यावर पडले. ही बातमी मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड.माधव जाधव यांना समजल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी जवळगाव येथे जाऊन सदरील कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच लहान मुलीच्या नावे एफ.डी करण्यासाठी ॲड.माधव जाधव यांनी १०,०००/- (दहा हजार रूपये) आर्थिक मदत लहान मुलांचे आजी व आजोबा ज्ञानोबा डेरनासे व गंगाबाई डेरनासे यांना केली. तसेच लहान मुली व मुलगा यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ॲड.माधव जाधव यांनी घेतली. शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन ॲड.माधव जाधव यांनी दिले. यावेळी जवळगाव येथील राजपाल शिंदे, दत्ता साळुंके, गजानन देशमुख, सचिन चौधरी, भास्कर हारे, मनोज साळुंके, सयाजी हारे इत्यादी उपस्थित होते.
================================================
Comments
Post a Comment