राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनोखे आंदोलन ; शिधा भेट देवून करण्यात आला महाराष्ट्र शासनाचा निषेध




पाडवा झाला, 14 एप्रिल जवळ आली, आनंदाचा शिधा कुठे गेला..? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सवाल

============================================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सोमवार, दिनांक 27 मार्च 2023 रोजी तहसिलदार कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्र शासनास निवेदन तसेच आनंदाचा शिधा भेट देवून घोषणा देत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुढाकार घेत हे आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात एकच चर्चा झाली.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली. परंतु, दिवाळी गेली, गुढी पाडवा गेला तरीही आनंदाचा शिधा वेळेत मिळाला नाही. आता 14 एप्रिलच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला देण्याची घोषणा केली. ती घोषणा पण, सध्या कागदावरच आहे. त्यामुळे माजी मंत्री आ.धनंजयजी मुंडे, माजी आमदार संजय दौंड, केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्विराज साठे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष पंकजजी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्य शासनास आनंदाचा शिधा भेट देवून, गगनभेदी घोषणा देत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग बीड जिल्हा उपाध्यक्ष महेश वेडे यांच्या वतीने आनंदाचा शिधा आणि निषेधाचे निवेदन पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड यांना देण्यात आले. या प्रसंगी युवा नेते भिमसेन लोमटे, उज्जैन बनसोडे, भगवानराव ढगे, दत्ता सरवदे, सुधाकर जोगदंड, हमीद चौधरी, गुड्डू जोगदंड, योगेश माने, धनराज सोनवणे, जुबेर बागवान नरेश, सोमवंशी, आशिष गोडबोले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


============================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)