'स्वरमंडल'च्या गझलसम्राट सुरेश भट पुरस्काराने सुप्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांचा आज सन्मान होणार
अंबाजोगाईत १९ मार्च रोजी पुरस्कार सोहळा व गझल दरबारचे आयोजन
===============================================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
राजर्षी गंधर्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्वरमंडल संगीत विद्यालय, अंबाजोगाई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार यावर्षी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार कवी नितीन देशमुख (अमरावती) यांना जाहीर झाला असून आज १९ मार्च २०२३ रोजी सायं ५:३० वा. अंबाजोगाई येथील स्व.विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी विचारमंचावर माजी उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ए.बी.पी.माझाचे जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके, माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यानंतर लगेचच विशाल राजगुरू (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील नामवंत गझलकारांच्या गझल दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. या मुशायऱ्या मध्ये नितीन देशमुखांसह आत्माराम जाधव (गंगाखेड), आत्तम गेंदे (पालम), गोरख पालवे (नाशिक)आणि दिवाकर जोशी (परळी) या निमंत्रितांचा सहभाग असणार आहे. या दर्जेदार कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वरमंडल संगीत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजकुमार ठोके (गुरूजी) यांनी केले आहे. २०१६ पासून या कार्यक्रमाचे आयोजन स्वरमंडल संगीत विद्यालयाच्या वतीने केले जाते. या कार्यक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. तसेच या कार्यक्रमात सातत्याने कांही नित्यनवीन बदल करण्याचा प्रयत्न संयोजकांच्या वतीने रासिकांच्या सुचनेचा मान राखून केले जातात. २०२१ पासून या कार्यक्रमात "गज़लसम्राट" सुरेश भट पुरस्कार देण्यात येतो. 2021 सालचा पुरस्कार गोविंद हाके यांना देण्यात आला. तर २०२२ सालचा पुरस्कार आबेद शेख (यवतमाळ)यांना देण्यात आला. २०२३ सालचा पुरस्कार नितीन देशमुरव (अमरावती) यांना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम तीन सत्रात होणार आहे. सत्र पहिले : उद्घाटन आहे. उदघाटक म्हणून तोष शिनगारे (माजी नगरसेवक), अध्यक्षस्थानी दगडू दादा लोमटे (सामाजिक कार्यकर्ते) हे आहेत, सुत्रसंचलन : प्रा.राहूल सुरवसे हे करतील. सत्र दुसरे : पुरस्कार वितरण हे असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष) आणि प्रमुख अतिथी म्हणून गोविंद शेळके (एबीपी माझाचे बीड जिल्हा प्रतिनिधी) हे तर मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे सर हे असतील, पुरस्कार प्राप्त मान्यवर नितीन देशमुख, सुत्रसंचलन : परमेश्वर गित्ते (संपादक दै.वार्ता) हे करतील, सत्र तिसरे : गज़ल दरबार" अध्यक्ष विशाल राजगुरू (मुंबई), नितीन देशमुख (अमरावती), आत्तम गेंदे (पालम), गोरख पालवे (नाशिक), दिवाकर जोशी (परळी) तर सुत्रसंचलन आत्माराम जाधव (गंगाखेड) हे करणार आहेत.
=================================================
Comments
Post a Comment