मौजे जवळगाव येथे घडले राष्ट्रभक्तीचे दर्शन ; गावकर्यांनी केला आजी - माजी सैनिकांचा ह्रद्य सन्मान

मौजे जवळगाव येथे गावकर्यांनी केला आजी - माजी सैनिकांचा ह्रद्य सन्मान ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) तालुक्यातील मौजे जवळगाव येथे राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले. गावकर्यांनी एकत्रित येत देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या आजी - माजी सैनिकांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला होता. निमित्त होते. भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे, या प्रसंगी जवळगाव येथील श्री.हनुमान विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या सन्मान सोहळ्याने नवी प्रेरणा मिळाली. तालुक्यातील मौजे जवळगाव येथे गावकर्यांनी एकत्रित येत मोठ्या उत्साहात देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या आजी - माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून आणि फेटा बांधून हृद्य असा सत्कार केला. या कार्यक्रमास मौजे जवळगाव येथील नागरिक, युवक आणि महिला, भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जवळगाव येथील श्री.हनुमान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजाताई देशमुख आणि त्यांचे सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच...